
Pune News: राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने देण्यात येणारा देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार’ हा पुणे जिल्ह्यातील भिमाशंकर सहकारी साखर कारखान्यास (दत्तात्रेय नगर, ता. आंबेगाव) जाहीर झाला आहे.
यात सहभागी एकूण १०३ सहकारी साखर कारखान्यांच्या तुलनेत एकूण २५ पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील १० साखर कारखान्यांनी पुरस्कार मिळून आघाडी घेतली आहे. त्याखालोखाल तमिळनाडूला ५, उत्तरप्रदेशला ४, गुजरातला ३, तर पंजाब, हरियाना, आणि मध्यप्रदेशातील प्रत्येकी एका कारखान्याला पुरस्कार मिळाला आहे.
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने साखर कारखान्यांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी (ता.२२) पत्रकार परिषदेमध्ये केली. पुरस्कारांचे वितरण केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. पत्रकार परिषदेला संघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे उपस्थित होते.-
विविध विभागनिहाय पुरस्कार पुढील प्रमाणे
उत्कृष्ट ऊस उत्पादकता गट
प्रथम : विघ्नहर सहकारी साखर कारखाना (शिरोली, निवृत्तीनगर, ता.जुन्नर)
द्वितीय : क्रांती अग्रणी डॉ. जी.डी. बापू लाड शेतकरी सहकारी साखर कारखाना
तृतीय : श्री महुवा प्रदेश सहकारी खांड उद्योग (सुरत, गुजरात)
तांत्रिक क्षमता गट
प्रथम : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना (कराड, जि.सातारा)
द्वितीय : कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना (श्रीपूर, सोलापूर)
तृतीय : डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना ( वांगी, जि. सांगली)
उत्कृष्ट वित्तीय व्यवस्थापन पुरस्कार
प्रथम : कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना ( जालना)
द्वितीय : श्री खेडूत सहकारी खांड उद्योग मंडळी (पांडवाई, गुजरात)
तृतीय : श्री. नर्मदा खांडसरी उद्योग सहकारी मंडळी (नांदोड, नर्मदा, गुजरात)
विक्रमी ऊस गाळप विभाग
प्रथम : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना (माढा, सोलापूर)
विक्रमी साखर उतारा
प्रथम : कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना (कोल्हापूर)
उच्च साखर उतारा अत्युत्कृष्ट साखर कारखाना
श्री. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना (बारामती, जि.पुणे)
उर्वरित विभाग
उत्कृष्ट ऊस उत्पादकता
प्रथम : बुधेवाल सहकारी शुगर मिल्स (लुधीयाना पंजाब)
द्वितीय : कल्लाकुरिची कॉपरेटिव्ह शुगर (विल्लुपुरम, तामिळनाडू)
तृतीय : किसान सहकारी साखर कारखाना (पोवांय, उत्तरप्रदेश)
तांत्रिक कार्यक्षमता
प्रथम : करनाल सहकारी साखर कारखाना (करनाल, हरियाणा)
द्वितीय : चेय्यार सहकारी साखर कारखाना (अंकापूर,तामिळनाडू)
तृतीय : किसान सहकारी साखर कारखाना (आझमगढ, उत्तरप्रदेश)
उत्कृष्ट वित्तीय व्यवस्थापन
प्रथम -:नवलसिंह सहकारी साखर कारखाना (नवलनगर, बर्हाणपूर, मध्यप्रदेश)
द्वितीय : चेंगलरायन सहकारी साखर कारखाना (थिरूवैनैनाल्लूर, तामिळनाडू)
तृतीय : धर्मापूरी डिस्ट्रिक्ट सहकारी साखर कारखाना (थैमानहळ्ली, धर्मापूरी, तामिळनाडू)
विक्रमी ऊस गाळप
प्रथम : रमाला सहकारी साखर कारखाना (रमाला बरूत, जि. बागपत, उत्तरप्रदेश)
विक्रमी साखर उतारा
प्रथम : किसान सहकारी साखर कारखाना (गजरौला, जि.अमरोहा, बागपत, उत्तरप्रदेश)
उर्वरित विभागातील अत्युत्कृष्ट सहकारी साखर कारखाना
सुब्रनिया शिवा सहकारी साखर कारखाना (गोपालापूरम, धर्मापूरी, तामिळनाडू)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.