Bhimashankar Sugar Factory : भीमाशंकर कारखान्याचा भंगार विक्रीत भ्रष्‍टाचार ः निकम

Scrap Sale Scam : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम उशिरा सुरू झाल्याने याचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे.
Bhimashankar Sugar Factory
Bhimashankar Sugar FactoryAgrowon
Published on
Updated on

Pune News : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम उशिरा सुरू झाल्याने याचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. अनेक शेतकऱ्यांचे ऊस २० ते २१ महिन्यांचे झाले असून ते तोडले गेले नाहीत, परंतु तालुक्यात दोन ते अडीच लाख टन ऊस शिल्लक असतानाही बाहेरच्या तालुक्यातून ऊस आणल्याने भीमाशंकरचे मोठे नुकसान झाले आहे.

कारखान्यातून बाहेर जाणाऱ्या भंगारामध्येही मोठा काळा बाजार झाला असल्याचा आरोप भीमाशंकर सहकारी कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम यांनी केला आहे. निकम म्हणाले, की मार्च महिना असल्याने शेतकऱ्यांना सोसायटी, बँकेत कर्ज भरणे यासाठी पैसे लागत आहे. मात्र ऊस न गेल्याने तो आर्थिक अडचणीत सापडला आहे. वाढत्या उन्हामुळे उसाचे उत्पादनात घट होत आहे.

Bhimashankar Sugar Factory
Bhimashankar Sugar Mill : भीमाशंकर कारखान्यामध्ये मिल रोलरचे पूजन

तालुक्यात दोन ते अडीच लाख टन ऊस शिल्लक असतानाही बाहेरच्या तालुक्यातून बिगर नोंदीचा ऊस आणण्याची गरज काय होती. पराग कारखान्याला ऊस देण्याचा निर्णय शेती समितीने घेतला. भीमाशंकर कडे नोंद असलेल्या ऊस परागला दिला मात्र भिमाशंकरने बाहेरून आणलेल्या उसाला शंभर रुपये टनामागे अतिरिक्त वाहतूक खर्च द्यावा लागतो. |

Bhimashankar Sugar Factory
Bhimashankar Sugar Factory : ‘भीमाशंकर’कडून प्रति टन २५० रुपये हप्ता जमा : अध्यक्ष बाळासाहेब बेंडे

त्यामुळे याला जबाबदार कोण, असा प्रश्‍न उपस्थित केला. तर पराग साखर कारखान्याला भीमाशंकरचा ऊस दिला जातो, तसेच टोळ्यादेखील दिल्या जातात व इतर मटेरिअल देखील दिले जाते तसेच भीमाशंकर कारखान्याचा पगार घेऊन काहीजण पराग कारखान्यासाठी काम करतात असा आरोपही देवदत्त निकम यांनी केला.

भीमाशंकर कारखान्यातून बाहेर जाणाऱ्या भंगारमध्ये बऱ्याच दिवसापासून मोठा काळा बाजार सुरू होता याबाबत मी स्वतः जाऊन पाहणी केली असता भंगाराच्या गाड्यांमध्ये लोखंडाबरोबर ॲल्युमिनिअम देखील पाठवले जात असल्याचे निदर्शनात आले आहे.

भंगार लिलावात लोखंड ४३ रुपये किलो व ॲल्युमिनिअम २०० रुपये असे ठरले असून लोखंडाबरोबर ॲल्युमिनियम नेले जात असल्याने किलोमागे १५७ रुपयांचा तोटा कारखाना सहन करत आहे. याला जबाबदार कोण, याचा शोध घ्यावा असे निकम म्हणाले. पत्रकार परिषदेला संजय बढेकर, शरद बोंबे, माउली ढोमे, विशाल भोर, बाळासाहेब वाळुंज, टी. पी. दाभाडे, बाबाजी पुंडे उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com