Government Scheme : भेंडी शाळा ‘मुख्यमंत्री माझी शाळा...’ योजनेत प्रथम

CM Majhi Shala, Sundar Shala Scheme : जिल्हा परिषद शाळांच्या भौतिक सुविधांमध्ये वाढ व्हावी, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि सातत्यपूर्ण सर्वंकष शिक्षण मिळावे, या उद्देशाने मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळा’ अभियानाची अंमलबजावणी करण्यात आली.
CM Majhi Shala, Sundar Shala Scheme
CM Majhi Shala, Sundar Shala SchemeAgrowon

Kalvan News : जिल्हा परिषद शाळांच्या भौतिक सुविधांमध्ये वाढ व्हावी, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि सातत्यपूर्ण सर्वंकष शिक्षण मिळावे, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील सर्व प्रकारच्या व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये ‘मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळा’ अभियानाची अंमलबजावणी करण्यात आली.

या मूल्यांकनात तालुक्यातील भेंडी जिल्हा परिषद शाळा तालुक्यात अव्वल ठरली. शाळेला तीन लाखांचे बक्षीस जाहीर झाले. तर चणकापूर शासकीय आश्रमशाळा द्वितीय, दह्याणे जिल्हा परिषद शाळेला तृतीय क्रमांक मिळाला.२०२३ पासून ‘मुख्यमंत्री माझी शाळा- सुंदर शाळा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांच्या भौतिक सुविधांमध्ये वाढ करणे, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत विशेष भर घालणे हा मुख्य उद्देश आहे.

CM Majhi Shala, Sundar Shala Scheme
CM Scheme : ‘माझी शाळा’ स्पर्धेत साखरा राज्यात प्रथम

या उपक्रमात शाळेतील भौतिक सोयी-सुविधा अद्यावत करणे, पोषण आहाराचा मेन्यू तयार करणे, ग्रंथालय, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, शिष्यवृत्ती परिक्षेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदविणे, विद्यार्थ्यांचे बौध्दिक क्षमता वाढावी, या दृष्टीकोनातून स्पर्धा परीक्षा घेणे, शाळा व परिसराचे सौंदर्यीकरण यासह अनेक बाबींचा समावेश आहे. मुल्यांकन १० ते १५ फेब्रुवारीदरम्यान करण्यात आले.

CM Majhi Shala, Sundar Shala Scheme
Educational Abhiyan : ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान यशस्वी करा : पाटील

भेंडी शाळेला भौतिक सुविधेसह सौंदर्यीकरणासाठी सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांनी कौशल्यपूर्वक निधी उपलब्ध करून दिला. मुख्याध्यापक जिभाऊ निकम यांनी शिक्षकांच्या सहकार्याने शाळा प्रथम आणण्यासाठी परिश्रम घेतले. या यशाबद्दल गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील, गटशिक्षणाधिकारी हेमंत बच्छाव, विस्तार अधिकारी शीतल कोठावदे, संजय चव्हाण, पांडुरंग महाले, केंद्रप्रमुख माधुरी नागरे यांनी अभिनंदन केले आहे.

उपक्रम यशस्वीतेसाठी सरपंच किशोर ठाकरे, उपसरपंच विजय रौंदळ, योगेश रौंदळ, ग्रामसेवक राजाराम खांडवी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिल रौंदळ, उपाध्यक्ष मनीषा रौंदळ, सदस्य भाऊसाहेब बच्छाव, पोपट रौंदळ, तुषार रौंदळ, जयश्री रौंदळ, भाग्यश्री रौंदळ, जनाबाई माळी, भिवराज बच्छाव, वैशाली सोनवणे, ललिता रौंदळ, शिक्षक विजय पगारे, प्रतिभा पाटील, राघो निकम, मधुकर वाघ, देवीदास आहेर, रूपाली पाटील यांनी परीश्रम घेतले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com