Digital Agriculture India : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी मंगळवारी (ता.१७) केले. भारत विस्तार एआय आधारित टूलच्या उद्घाटनप्रसंगी कृषिमंत्री चौहान राजस्थान येथील जयपूर येथे बोलत होते. यावेळी राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, केंद्रीय कृषी राज्यमंत्री भागीरथ चौधरी, राजस्थानचे कृषिमंत्री किरोडी लाल मीना, खासदार मंजू शर्मा, केंद्रीय कृषी सचिव देवेश चतुर्वेदी आदी उपस्थित होते. .भारत विस्तार एआयबद्दल बोलताना कृषिमंत्री म्हणाले, "पिकांवर अचानक कीडरोगांचा प्रादुर्भाव झाला तर शेतकऱ्यांची चिंता वाढते. परंतु काय करावं, ते कळत नाही. आता मात्र शेतकरी मोबाईलवरून १५५२६१ नंबरवर फोन करून विचारू शकतात, या कीडरोगांवर कोणती फवारणी करू. त्यावर तत्काळ उत्तर तुम्हाला भारत विस्तार एआय देईल. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही." असा विश्वास कृषिमंत्र्यांनी व्यक्त केला. तसेच कोणते बियाणे वापरावे, किती खत द्यावे, जमिनीची निवड कशी करावी याबाबतची माहिती देखील भारत विस्तार देते, असेही कृषिमंत्री म्हणाले..Shivraj Singh Chauhan: शेतकऱ्यांना मदत करण्यात कुचराई करणार नाही.भारत एआय शेतकऱ्यांना हवामानचा अंदाज, बाजारभाव, शेती सल्ला, योजनांची माहिती आदीची माहिती देतो, असा दावा करताना कृषिमंत्री सांगितले की, "शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना, पंतप्रधान पिक विमा योजना, माती आरोग्य कार्ड, मॉडिफाइड इंटरेस्ट सबव्हेन्शन योजना, कृषी यांत्रिकीकरण उप अभियान, प्रति थेंब अधिक पिक, पंतप्रधान कृषी सिंचन योजना, पंतप्रधान अन्नदाता उत्पन्न सुरक्षा अभियान, अॅग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड, किसान क्रेडिट कार्ड आणि हवामान व कीडसंदर्भातील अलर्टही मिळणार आहेत.".शेतकरी ओळखपत्रअॅग्रीस्टॅकच्या अंतर्गत शेतकऱ्यांना ओळखपत्र दिली जात आहे. त्यात शेतकरी ओळख क्रमांक दिला जात आहे. या ओळख पत्रातून शेतकऱ्यांची सर्व माहिती एकाच जागी ठेवण्यात येते. आता शेतकऱ्यांना पिककर्ज घ्यायचं असेल तर बॅंकांकडून विविध कागदपत्रांची मागणी केली जाते. परंतु आता ओळखपत्रामुळे कागदपत्राची गरज राहणार नाही. ओळखपत्र क्रमांक सांगितल्यानंतर सर्व माहिती बॅंकांना खुली होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना विविध कार्यालयाचे खेटे मारण्याची गरज नाही, असा दावा कृषिमंत्री चौहान यांनी केला..शेतकरी कसे वापरू शकतात?‘भारती’ नावाचा एआय व्हॉईस असिस्टंट या प्लॅटफॉर्ममध्ये असणार आहे. शेतकरी १५५२६१ या क्रमांकावर कॉल करून थेट माहिती मिळवू शकतात. त्यासाठी कोणतेही वेगळे अॅप डाउनलोड करण्याची गरज नाही. शेतकऱ्यांना २४ तास सेवा उपलब्ध मिळणार आहे. यामध्ये ‘कृषी साथी’ नावाचा एआय चॅटबॉट ऑडिओ मजकूर किंवा व्हिडिओद्वारे प्रश्न विचारण्याची सुविधा देणार आहे..Bharat-VISTAAR AI : 'भारत-विस्तार एआय' १७ फेब्रुवारीपासून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणार; कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते उद्घाटन.दरम्यान, कृषी विभागाच्या कार्यक्रमांचे उद्घाटन यापूर्वी दिल्लीत होत असत. परंतु आम्ही ठरवलं की, कृषी विभागाचे कार्यक्रम शेतकऱ्यांसोबत केले जातील. शेतकऱ्यांची प्रगती करायची असेल तर गावाखेड्यात जावं लागेल, असे प्रतिपादन कृषिमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी केले.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.