Onion Rate : ठाण्यात उत्तम दर्जाचा कांदा अर्ध्या किमतीत

Onion Market : अनेक दिवसांपासून कांद्याच्या दरात सुधारणा होत असून ६० ते ८० रुपये भावाने कांदा विकला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.
Onion Rate
Onion RateAgrowon
Published on
Updated on

Thane News : अनेक दिवसांपासून कांद्याच्या दरात सुधारणा होत असून ६० ते ८० रुपये भावाने कांदा विकला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. अशा वेळी आमदार संजय केळकर यांच्या उपक्रमाने ठाणेकर ग्राहकांना दिलासा मिळत असून, उत्तम दर्जाचा कांदा अवघ्या अर्ध्या किमतीत म्हणजे ३५ रुपयांना उपलब्ध करून देण्यात येत आहे.

कांद्याचे उत्पादन कमी झाल्याने; तसेच पावसामुळे आवक घटली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातही निकृष्ट दर्जाचा कांदा ६० ते ८० रुपये किलोने विकला जात आहे. कांद्याच्या दरात सुधारणा होत असल्याने शेतकऱ्यांना त्यामुळे दिलासा मिळत आहे. कांदा उत्पादक शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.

त्या‍ पार्श्वभूमीवर आमदार संजय केळकर यांनी ठाणेकरांना ते अध्यक्ष असलेल्या संस्कार संस्थेच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या एनसीसीएफ या राष्ट्रीय ग्राहक फोरमच्या सहकार्याने उत्तम दर्जाचा कांदा अवघ्या ३५ रुपये किलोने उपलब्ध करून दिला आहे. प्रत्येकी पाच किलो कांदे फक्त १७५ रुपये किलोने देण्यात येत आहे.

Onion Rate
Onion Market : अफगाणिस्तानचा कांदा भारतामध्ये दाखल

ठाण्यात सध्या चार ठिकाणी विक्री केंद्रे सुरू आहेत. लवकरच आणखी केंद्रे सुरू करणार आहेत. उत्तम दर्जाचा कांदा अर्ध्या किमतीत मिळत असल्याने त्यांचे स्वयंपाकघरातील बिघडलेले बजेट रुळावर येणार असल्याने त्यांनी आमदार संजय केळकर यांचे आभार मानले आहेत.

आंबा महोत्सव आणि अनेक ठिकाणी शेतकरी आठवडा बाजार दरवर्षी केळकर यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात येतो. या उपक्रमाद्वारे शेतकरी उत्पादक आणि सर्वसामान्य नागरिकांची थेट भेट होत असल्याने नागरिकांना उत्तम प्रतीचा भाजीपाला, हापूस आंबे वाजवी दरात मिळतात.

Onion Rate
Onion Market : कांद्याला चांगला भाव तरिही शेतकऱ्यांच्या हातात पंधरा दिवसांनी पैसे

या व्यवहारात दलाल नसल्याने दोन्ही घटकांना फायदा होतो. या उपक्रमांबरोबरच आता ना नफा ना तोटा या तत्त्वावर कांदा विक्री करण्यात येत आहे. त्यामुळे ठाणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण

पहिल्या दिवशी १५ टन कांदा उपलब्ध झाला असून ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर विकला. त्यामुळे विविध केंद्रांवर महिलांच्या उड्या पडू लागल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहिल्याच दिवशी चंदनवाडी येथे चार हजारांहून अधिक महिलांनी, तर विष्णूनगर येथील केंद्रावर दीड हजारांहून जास्त जणांनी उपक्रमाचा लाभ घेतला. जसजसा कांदा उपलब्ध होईल, तसतशी विक्री केंद्रे वाढवण्यात येणार आहेत. शनिवारी केंद्रांची संख्या वाढणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या उपक्रमामुळे महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com