Onion Fertilizer Management : कांदा पिकास द्या संतुलित खतमात्रा

Onion Fertilizer Use : माती परीक्षण अहवालानुसार कांदा पिकासाठी रासायनिक खतांची मात्रा ठरवावी. कांद्याचे अपेक्षित उत्पादन मिळविण्यासाठी हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश या प्रमाणे रासायनिक खतांची शिफारस करण्यात आली आहे.
Onion Farming
Onion FarmingAgrowon
Published on
Updated on

Onion Prouction : माती परीक्षण अहवालानुसार कांदा पिकासाठी रासायनिक खतांची मात्रा ठरवावी. कांद्याचे अपेक्षित उत्पादन मिळविण्यासाठी हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश या प्रमाणे रासायनिक खतांची शिफारस करण्यात आली आहे.

उत्पादकता कमी होण्यामागील कारणे
  कमी दिवसांत तयार होणाऱ्या जातींची लागवड.
  सतत बदलत्या हवामानामुळे रोग, किडींचा वाढता प्रादुर्भाव.
  शिफारशीत जातीच्या बियाणांची अनुपलब्धता.
  स्थानिक वाणांची लागवड.
  संकरित जातींचा अभाव.
  सुधारित लागवड तंत्राचा अभाव.
  संतुलित खत व्यवस्थापनाचा अभाव.
  सेंद्रिय खतांचा अभाव.
पोषक हवामान
 

रब्बी हंगामासाठी साधारणतः ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात बी पेरून रोपांची लागवड डिसेंबर आणि जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात केली जाते. या कांद्याची काढणी उन्हाळ्यात होत असल्याने कांदा सुकविणे शक्य होते. असा कांदा साठवणुकीत अधिक चांगला टिकतो. रब्बी हंगामात लागवड केलेल्या कांद्यास अनुकूल हवामान मिळत असल्याने उत्पादनही चांगले मिळते.
  

Onion Farming
Agriculture Fertilizers : पिकांना द्या संतुलित खतमात्रा

कांद्याच्या उत्तम वाढीसाठी सुरुवातीचा काळात १० ते १५ अंश सेल्सिअस, कांदा पोसण्याच्या काळात २० ते ३०  अंश सेल्सिअस, तर काढणीच्या काळात ३० ते ३५  अंश सेल्सिअस इतके तापमान आवश्यक असते.
  साधारपणे १० ते १२ तास स्वच्छ सूर्यप्रकाश मिळाल्यास कांद्याची वाढ चांगली होते.  
जमिनीची निवड
  उत्तम निचरा होणारी, हलकी ते मध्यम भारी जमीन.
  हलक्या जमिनीत सेंद्रिय खतांचा पुरवठा केल्यास चांगले उत्पादन मिळते.
  योग्य वाढीसाठी जमिनीचा सामू ६.५ ते ७.० च्या दरम्यान असावा.
  कांद्याची मुळे १५ ते २० से.मी खोली पर्यंत वाढतात. त्यामुळे मुळाभोवती जमीन नेहमी भुसभुशीत
असावी.
 

Onion Farming
Onion Fertilizer: कांद्याच्या चांगल्या वाढीसाठी खरीपातील कांदा खत व्यवस्थापन

 भारी, चिकणमाती असलेली जमीन, चोपन, खारवट जमिनीत कांदा चांगला पोसत  नाही. कारण अशा जमिनी पाऊस पडल्यानंतर किंवा पाणी दिल्यानंतर एकदम कडक बनतात. त्यात कांदे व्यवस्थित पोसू शकत नाही. तसेच अशा जमिनीत लागवड केल्यामुळे कांद्याला रंगही चांगला येत नाही.
खत व्यवस्थापन
माती परीक्षण अहवालानुसार कांदा पिकासाठी रासायनिक खतांची मात्रा ठरवावी. कांद्याचे अपेक्षित उत्पादन मिळविण्यासाठी हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश या प्रमाणे रासायनिक खतांची शिफारस करण्यात आली आहे. तसेच आवश्यकतेनुसार गंधक २० ते ४५ किलो प्रति हेक्टर देण्याची शिफारस आहे. कांद्याची पुनर्लागवड करताना, युरिया १ गोणी अधिक सिंगल सुपर फॉस्फेट २.५ गोण्या अधिक म्युरेट ऑफ पोटॅशची मात्रा द्यावी.

विद्राव्य खतांचा वापर
(फवारणी ः प्रतिलिटर पाणी)

  लागवडीपासून ३० व ४५ दिवसांनी, १९:१९:१९ हे विद्राव्य खत ५ ग्रॅम.
  लागवडीपासून ६० व ७५  दिवसांनी, १३:००:४५ (पोटॅशिअम नायट्रेट) ५ ग्रॅम.
  लागवडीपासून ९० दिवसांनी, ०:०:५० हे विद्राव्य खत ५ ग्रॅम.

नत्राचा वापर
कांदा पिकास नत्राची आवश्यकता पिकाच्या वाढीच्या अनेक अवस्थांमध्ये असते. कड्याचे रोप लावल्यानंतर दोन महिन्यापर्यंत नत्राची गरज ही जास्त असते. त्याकरिता नत्राची मात्रा २ ते ३ हप्त्यात विभागून द्यावी. त्याचा पिकास चांगला फायदा होतो. पिकाची मुळे रुजल्यानंतर नत्राची गरज असते. कांदा पूर्ण पोसल्यानंतर नत्राची आवश्यकता जास्त नसते. अशावेळी नत्राची मात्रा दिल्यास जोड कांदे येणे, कांदा साठवणुकीत सडणे, साठवणक्षमता कमी होणे असे प्रकार होतात. त्यासाठी रब्बी हंगामात कांदा लागवडीनंतर ६० दिवसांच्या आत २ ते ३ हप्त्यात शिफारशीत नत्राची मात्रा देणे फायदेशीर ठरते.
शिफारशीत मात्रेपेक्षा जास्त आणि लागवडीच्या ६० दिवसानंतर नत्राची मात्रा दिल्यास,
  कांद्याची पात जास्त वाढते.
  माना जाड होतात.
  कांदा आकाराने लहान राहतो.
  जोड कांद्याचे प्रमाण जास्त निघते.
  साठवण क्षमता कमी होते.

स्फुरद आणि पालाश वापराची वेळ
  पिकाच्या मुळांच्या वाढीकरिता स्फुरदाची आवश्यकता   असते.
  स्फुरद जमिनीत ४ इंच खोलीवर लागवडी अगोदर दिल्यास नवीन मुळे तयार होईपर्यंत स्फुरद उपलब्ध होते.
  स्फुरदाची मात्रा एकाच वेळी आणि लागवडीच्या अगोदर द्यावी.
  नत्रासोबत स्फुरदाची मात्रा दिल्यास स्फुरदाची उपलब्धता वाढते.
पालाश
आपल्या जमिनीत पालाशचे भरपूर प्रमाण आहे. मात्र पिकांना उपलब्ध होणाऱ्या पालाशची मात्रा कमी असल्यामुळे पेशींना काटकपणा येण्यासाठी, कांद्याचा टिकाऊपणा वाढविण्यासाठी तसेच कांद्याला आकर्षक रंग आणण्यासाठी पालाशची आवश्यकता पीक वाढीच्या सर्व अवस्थांमध्ये असते. पीक लागवडी अगोदर स्फुरदा बरोबरच पालाशची संपूर्ण मात्रा द्यावी.

गंधकाचे महत्त्व
  कांद्याची साठवण क्षमता वाढविण्यासाठी तसेच जमिनीत भुसभुशीतपणा टिकवून ठेवण्यासाठी गंधकयुक्त खतांचा वापर करणे आवश्यक आहे.
  अमोनिअम सल्फेट, सल्फेट ऑफ पोटॅश या सारख्या खतांचा वापर केल्यास त्यातून काही प्रमाणात गंधकाची मात्रा मिळते. अन्यथा गंधकयुक्त खतांचा वापर केल्यास फायदा होतो.
  कांदा लागवडीअगोदर सेंद्रिय खतांसोबत साधारणपणे हेक्टरी २० ते ४५ किलो गंधक खताची मात्रा द्यावी.
गंधकाचे फायदे
  कांद्याचा तिखटपणा वाढतो.
  कांदा  चांगला पोसतो.
  कांदे एकसारखे येतात
  कांद्याची चकाकी वाढते
  उत्पादनात हमखास वाढ मिळते
  कांदा साठवणुकीत जास्त दिवस टिकतो.
  पिकामध्ये रोग प्रतिकारक्षमता वाढते.

उत्पादनवाढीमध्ये
सूक्ष्म अन्नद्रव्यांचे  महत्त्व

कांदा  पिकाला सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज अतिशय कमी प्रमाणात असते.सेंद्रिय खतांचा चांगला पुरवठा असल्यास सर्वसाधारण जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भासत नाही. सूक्ष्म अन्नद्रव्ये अधिक प्रमाणात दिली गेल्यास त्याचा पिकावर अनिष्ट परिणाम दिसून येतो. त्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर जमिनीतून किंवा फवारणीद्वारे करावा.
  कांदा पिकास तांबे, लोह, जस्त, मॅंगेनीज व बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज भासते.
  तांबे या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे रोपांची वाढ खुंटते. पातीचा रंग करडा, निळसर होतो.
  जस्ताची कमतरता भासल्यास, पाने जाड होऊन खालील बाजूला वाकतात.
  कांद्याच्या अधिक उत्पादनासाठी पिकास फुले मायक्रो ग्रेड-२ या सूक्ष्म अन्नद्रव्यांची पहिली फवारणी ३० दिवसांनी ५ मिलि प्रति लिटर पाणी व दुसरी फवारणी ४५ दिवसांनी १० मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी.

महत्त्वाच्या टिप्स
  अधिक उत्पादनासाठी कांद्याची लागवड १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान करावी.
  कांदा रोपवाटिकेसाठी दर्जेदार वाण वापरावेत.
  सेंद्रिय खतांचा भरपूर वापर करावा.
  नत्रयुक्त खते ६० दिवसांच्या आत २ ते ३ हप्त्यात समान द्यावी.
  स्फुरद व पालाश लागवडीच्या वेळी द्यावे.
  आवश्यकतेनुसार गंधकाची मात्रा द्यावी.
  संयुक्त दाणेदार खतांमध्ये कमी नत्र आणि अधिक स्फुरद, पालाश असे खत देणे संयुक्तिक ठरते. उरलेल्या नत्राची मात्रा युरिया किंवा अमोनिअम सल्फेटद्वारे द्यावी.

रोप लागवडीच्या वेळी द्यावयाची खते (गोण्या) रोप लागवडीनंतर द्यावयाची युरिया खतमात्रा
मिश्र खताचे नाव मिश्र खत प्रमाण युरिया एमओपी ३० दिवसांनी ४५ दिवसांनी
१०:२६:२६ २ १ ०० अर्धी गोणी अर्धी गोणी
१५:१५:१५ ३ १ ०० अर्धी गोणी अर्धी गोणी
१९:१९:१९ २ अर्धी ०० अर्धी गोणी अर्धी गोणी
२४:२४:०० २ १ १ अर्धी गोणी अर्धी गोणी
१८:४६:०० १ १ १ अर्धी गोणी अर्धी गोणी

- डॉ. आदिनाथ ताकटे,  ९४०४०३२३८९
(कोरडवाहू शेती संशोधन केंद्र, सोलापूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com