Maharashtra Election Result : ‘लाडक्या बहिणीं’चा आशीर्वाद महायुतीला!

Mahayuti Wins in the Elections : राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला जो घवघवीत यशाचा कौल मिळाला त्यात ‘लाडक्या बहिणीं’चा आशीर्वाद मोलाचा ठरला आहे. या योजनेवरून विरोधकांनी टीकाही केली.
Election Result
Election ResultAgrowon
Published on
Updated on

Akola News : राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला जो घवघवीत यशाचा कौल मिळाला त्यात ‘लाडक्या बहिणीं’चा आशीर्वाद मोलाचा ठरला आहे. या योजनेवरून विरोधकांनी टीकाही केली.

राज्यात गेल्या काळात महायुती शासनाने १८ ते ६० वर्षे वयोगटातील महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना घोषित केली होती. मात्र, महिलांमध्ये या योजनेचा चांगला संदेश गेला. हे लक्षात घेत निवडणूक जाहीरनामा घोषित करताना महाविकास आघाडीलासुद्धा आपली सत्ता आली, तर दरमहा ३ हजार रुपये देऊ, असे जाहीर करावे लागले होते.

Election Result
Chandrakat Patil On Election Result : सत्ता आमचीच; १६० जागा येतील असा चंद्रकात पाटील दावा, माझा विजय होणारच!

या विधानसभा निवडणुकीत ही योजना महायुतीसाठी सर्वाधिक फायदा मिळवून देणारी ठरली. महायुतीविरुद्ध ग्रामीण भागात प्रामुख्याने शेतीमालाचे दर, महागाई अशा नकारात्मक बाबी विरोधकांनी प्रचारात जोराने मांडल्यासुद्धा. परंतु ‘लाडक्या बहिणीं’नी महायुतीला तारल्याचे स्पष्ट झाले आहे.

Election Result
Maharashtra Vidhan Sabha Election Results : काँग्रेसच्या दिग्गजांना मोठा धक्का, पृथ्वीराज चव्हाण, थोरात, देखमुखांसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर

या वेळी राज्यातील विधानसभा निवडणुकीत एकूण ६६.०५ टक्के मतदान झाले. २०१९ च्या तुलनेत या वेळी सुमारे ५ टक्के अधिक लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे या वेळी पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त होती. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार एकूण ६ कोटी ४४ लाख ८८ हजार १९५ मतदारांपैकी ३ कोटी ३४ लाख ३७ हजार ५७ पुरुष आणि ३ कोटी ६ लाख ४९ हजार ३१८ महिलांनी मतदान केले होते.

राज्य शासनाने २०२४-२५ च्या अर्थसंकल्पामध्ये राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना जाहीर केली आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा या योजनेचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले होते. लाभार्थी महिलांच्या खात्यावर हे पैसे थेट जमा केले जातात.

निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकारने घाईघाईत नोव्हेंबरचा हप्ता सुद्धा खात्यात जमा करून महिलांना आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा फायदा महायुती सरकारला निश्‍चित झालेला आहे. महायुतीच्या विजयात लाडक्या बहिणींचा वाटा मोलाचा ठरला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com