Mahua Flower : मोहफुलांच्या प्रक्रियेआड व्यसनाधीनतेचा डाव उधळला

Mahua Update : मोहफुलाच्या मूल्यवर्धनातून आदिवासींची आर्थिक सक्षमता अशा गोंडस शब्दाआड गडचिरोली जिल्ह्यात मोहफुलांपासून दारू तयार करण्याच्या कारखान्याला मान्यता देण्यात आली होती. मात्र ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अभय बंग यांच्या नेतृत्वात या विरोधात मोहीम छेडण्यात आली.
Mahua Flower
Mahua FlowerAgrowon

Gadchiroli News : मोहफुलाच्या मूल्यवर्धनातून आदिवासींची आर्थिक सक्षमता अशा गोंडस शब्दाआड गडचिरोली जिल्ह्यात मोहफुलांपासून दारू तयार करण्याच्या कारखान्याला मान्यता देण्यात आली होती. मात्र ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अभय बंग यांच्या नेतृत्वात या विरोधात मोहीम छेडण्यात आली. तब्बल १४०० गावांनी या विरोधात ठराव केले. त्यामुळे अखेरीस शासनाला हा निर्णय मागे घ्यावा लागला. लोकशक्‍तीचा हा मोठा विजय मानला जात आहे.

नक्षल आणि आदिवासीप्रवण असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अनेक शतकांपासून दारूबंदी आहे. परिणामी या ठिकाणी व्यसनाधीनता देखील नियंत्रणात आहे. असे असतानाच शासनाने या भागात मिळणाऱ्या मोहफुलांवर प्रक्रिया झाल्यास त्यातून रोजगार निर्मिती होईल, असा विचार मांडला. त्याआड शासनाला या परिसरात मोहफुलांपासून दारू तयार करून त्याची विक्री करायची होती. परंतु याला विरोध होईल या शक्‍यतेने या संदर्भाने कमालीची गुप्तता पाळण्यात आली.

Mahua Flower
Farm Electric Pump : शेतीचे विद्युत पंप चोरून विकायचे, पोलिसांनी केलं जेरबंद

अन्न व औषध प्रशासन मंत्री तसेच गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते या प्रकल्पाचे गुपचूप भूमिपूजनही आटोपण्यात आले. शासनाकडून हा प्रकल्प सुरू करण्याची घाई होत असल्याने त्यांचा हेतू स्पष्ट होत होता, असे सामाजिक कार्यकर्ते अभय बंग यांनी सांगितले.

परिणामी अभय बंग यांच्या नेतृत्वात या विरोधात मोहीम उघडण्यात आली. गावागावात जागृती करून ठराव घेत ते शासनाला पाठविण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यातील तब्बल १४०० गावांनी असे ठराव घेतले. त्यासोबतच या गावातील ८५ हजार व्यक्‍तींनी विरोधाचे पत्र शासनाला पाठविले. यामुळे शासनाला अखेर नमते घ्यावे लागले. त्यानंतरच्या काळात जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकल्पाची मान्यता रद्द केल्याचे जाहीर केले. त्यामुळे लोकशक्‍तीचा हा मोठा विजय मानला जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यात देखील तत्कालीन सरकारकडून दारूबंदी लादण्यात आली होती. त्यानंतर भाजपकडून येथील दारूबंदी उठविली.

Mahua Flower
Global Warming : आतापर्यंतचे सर्वाधिक उष्ण वर्ष २०२३ ठरले

प्राप्तीसाठी काही पण ...

चंद्रपूर जिल्ह्यात देखील तत्कालीन सरकारकडून दारूबंदी लादण्यात आली होती. त्यानंतर भाजपकडून येथील दारूबंदी उठविण्यात आली. त्यावरूनच महसूल प्राप्तीआड नागरिकांना व्यसनी बनविण्यासाठी पुढाकार घेतला जात असल्याचा आरोप सरकारवर या पार्श्‍वभूमीवर होत आहे.

शासनाला खरंच आदिवासी हित जपायचे असेल तर कुपोषणमुक्‍तीसाठी शेंगदाणा, गूळ आणि मोहफुलांपासून पौष्टिक लाडू तयार करून कुपोषितपट्ट्यात वाटप करण्याचा विचार त्यांनी केला पाहिजे. व्हिटॅमिन ए सह इतर अनेक पौष्टिक घटक मोहफुलांमध्ये आहेत. त्यामुळे कुपोषणाचा प्रश्‍न याद्वारे सुटेल. मोहफुलांवर प्रक्रिया करून दारू तयार केली असती तर प्रकल्पात स्थानिकांपैकी केवळ आठ जणांना रोजगार मिळाला असता. याउलट एक लाखापेक्षा अधिक जण व्यसनी झाले असते.
अभय बंग, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com