Bedana Market : बेदाणा बाजारात काय घडतंय ?

Team Agrowon

गेल्या महिनाभरात देशभरातून बेदाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे बेदाण्याचा चांगला उठावही होत आहे. दर्जेदार बेदाण्याला प्रति किलोस १०० ते २१० रुपये दर मिळत आहे.

Bedana Market | Agrowon

गेल्या महिन्यापासून बेदाण्याचे दर टिकून असून दर स्थिर राहतील, असा अंदाज बेदाणा उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला.

Bedana Market | Agrowon

दिवाळीच्या सुट्टीनंतर बाजारपेठेत देशातील व्यापारी बेदाणा खरेदीसाठी लगबग करत आहेत. सध्या बाजारात बेदाण्याची मागणी वाढली असल्याने उठावही होत आहे.

Bedana Market | Agrowon

दर टिकून असल्याने बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना या दराचा फायदा होत आहे. राज्यात गतवर्षी सुमारे ३ लाख टन बेदाण्याचे उत्पादन झाले होते. गतवर्षी फेब्रुवारीपासून नव्या बेदाण्याची विक्री सुरू झाली.

Bedana Market | Agrowon

अकरा महिन्यांत २ लाख ६० हजार टन बेदाणा डिसेंबरअखेर विक्री झाला. राज्यात ३१ डिसेंबरअखेर ४० हजार टन बेदाणा शिल्लक आहे. गेल्या महिन्याभरापासून दर स्थिर आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत जवळापास ८० ते ९० टक्के बेदाण्याची विक्री होईल.

Bedana Market | Agrowon

पुढील महिन्यातही दर टिकून राहतील, अशी शक्यता व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील बेदाणा निर्मितीचा हंगाम सर्वसाधारणपणे जानेवारीच्या दुसऱ्या, तिसऱ्या आठवड्यापासून सुरू होतो.

Bedana Market | Agrowon