Beekeeping : मधमाशी पालन प्रशिक्षण शिबिरात विद्यार्थ्यांना उद्योजकतेचा मंत्र

Beekeeping Training : केंद्रीय मधमाशी प्रशिक्षण व संशोधन संस्थेच्या वतीने येथील कृषी महाविद्यालयात पाच दिवसीय मधुमक्षिका पालन प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले.
Beekeeping
Beekeeping Agrowno
Published on
Updated on

Dharashiv News : केंद्रीय मधमाशी प्रशिक्षण व संशोधन संस्थेच्या वतीने येथील कृषी महाविद्यालयात पाच दिवसीय मधुमक्षिका पालन प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. शिबीरात विद्यार्थ्यांनी शेतीला जोडधंदा ठरु पहात असलेल्या मधमाशीपालनाचा कानमंत्र मिळाला.

संस्थेचे तज्ज्ञ प्रशिक्षक हेमंतकुमार डुंबरे यांनी मधमाशांची ओळख, त्यांच्या प्रजाती, मधमाशीच्या पेट्यांचे निरीक्षण करणे, पेट्या हाताळताना घ्यावयाची काळजी, पेट्यांची संख्या वाढवणे, मधमाशी पालन व्यवसाय सुरू करण्यासाठीचे विविध टप्पे आदी विषयावर विद्यार्थ्यांना माहिती दिली.

Beekeeping
Beekeeping : ‘मॉडेल व्‍हिलेज’ चेलका गावात मधुमक्षिका पालन

यासोबत सातेरी मधमाशी, युरोपियन तसेच डंखरहित मधमाशी हाताळण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. पेटीमध्ये नवीन मेणाचे शीट बनवून लावणे, हंगामानुसार पेटयांचे नियोजन कसे करावे, मध काढावा कसा, शुद्ध आणि अशुद्ध मध कसे ओळखावे, मधाव्यातिरिक्त मधमाशांपासून मिळणारी इतर उत्पादने उदा. परागकण, प्रोपोलीस, ई. गोळा करण्याची पद्धत, या बाबी प्रात्यक्षिकांसह विद्यार्थ्यांना दाखविण्यात आल्या.

बी पार्क अर्थात वर्षभर मधमाशांना आवश्यक फुलांचे शेतामध्ये नियोजन कसे करता येईल याबद्दल डुंबरे यांनी सखोल मार्गदर्शन केले. हिमाचल प्रदेश आणि मलेशिया येथील मधमाशी उद्योजकांशी ऑनलाइन संवाद साधून मधमाशी पालन व्यवसायातील त्यांच्या अनुभवकथन झाले. मधमाशी पालन उद्योग सुरू करण्यासाठी असलेल्या संधी, सरकारच्या विविध योजना, कर्जाची उपलब्धता आदीही विषयही समजावून देण्यात आल्या.

Beekeeping
Beekeeping Training : चंद्रपूरच्या २५ शेतकऱ्यांना मधुमक्षिकापालन प्रशिक्षणासाठी सुवर्णसंधी

शेतीला जोडधंदा म्हणूनही हा व्यवसाय कसा करता येईल आणि परागीभवन वाढवून आपल्या पिकांचे उत्पादन कसे वाढविता येईल, असेही श्री. डुंबरे यांनी सांगितले. प्रशिक्षणात सहभागी ९८ विद्यार्थ्यांना खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या वतीने प्रमाणपत्रे देण्यात आली. मधमाशी संवर्धन करण्याची प्रतिज्ञा घेतली.

विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीवर अवलंबून न राहता व्यवसायाकडे वळणे आवश्यक आहे. नवीन शैक्षणिक धोरणात देखील उद्योजकता आणि कौशल्य विकास यावर भर देण्यात आलेला आहे. तरुणांना उद्योग उभारणीसाठी साठी सरकारी पातळीवरून देखील चांगल्या प्रकारचे अर्थसाह्य मिळते. मध उत्पादना सोबतच शेतीमध्ये उत्पादन वाढीसाठी मधमाशांची वाढती गरज लक्षात घेता कृषी शिक्षण घेणाऱ्या तरुणांकरिता मधमाशी पालन हा अतिशय प्रभावी व्यवसाय होऊ शकतो.
- डॉ. दिगंबर पेरके, सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य, कृषी महाविद्यालय, धाराशिव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com