Fake Agricultural Fertilizer : बनावट कृषी निविष्ठांची विक्री होऊ नये यासाठी दक्षता घ्या

Agricultural Fertilizer Fake Nifad : नुकसानभरपाई व विमा रक्कम शेतकऱ्यांना तत्काळ मिळावी, यासाठी महसूल प्रशासनाने पावले उचलावीत, अशा सूचना निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी दिल्या.
Fake Agricultural Fertilizer
Fake Agricultural Fertilizeragrowon
Published on
Updated on

Agricultural Fertilizer : पिंपळगाव बसवंत (ता. निफाड) सुमार दर्जाची खते, बियाणे मिळाल्याने गतवर्षी शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. हा कटू अनुभव पाहता कृषी विभागाने डोळ्यांत तेल घालून बनावट कृषी निविष्ठाची विक्री होऊ नये यासाठी दक्षता घ्यावी. नुकसानभरपाई व विमा रक्कम शेतकऱ्यांना तत्काळ मिळावी, यासाठी महसूल प्रशासनाने पावले उचलावीत, अशा सूचना निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी दिल्या.

निफाड तालुक्यात पिंपळगाव येथील स्व. अशोक बनकर पतसंस्थेत झालेल्या आगामी खरीप हंगामाच्या पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरून आमदार बनकर बोलत होते. बैठकीस पिंपळगाव बाजार समितीचे संचालक रामभाऊ माळोदे, तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार, सहायक निबंधक कांतिलाल गायकवाड, गटविकास अधिकारी तुकाराम जाधव, नायब तहसीलदार मुळीक आदी उपस्थित होते.

Fake Agricultural Fertilizer
Nifad Dry Port : निफाड ड्रायपोर्ट जमीन खरेदीसाठी ‘जेएनपीए’ला निर्देश

आमदार बनकर म्हणाले, की खरीप हंगामातील पिकांवर शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक नियोजन असते. त्यात त्यांची फसवणूक होऊ नये. निफाड तालुक्यात पिकांमध्ये स्थित्यंतर घडत असून, केळी लागवडीला शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. खतांचे लिंकिंग होणार नाही, यावर करडी नजर ठेवा.

बैठकीत खरीप हंगामात पीकनिहाय अंदाजे क्षेत्र, त्यासाठी लागणारे बियाणे व खते, अंदाजे पर्जन्यमान, पीकविमा योजना, फळबाग लागवड, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजना, सूक्ष्मसिंचन, पिकांवरील कीड व रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प, कृषी यांत्रिकीकरण अभियान यांसह विविध योजनांवर सविस्तर चर्चा झाली.

शासनाकडून आलेली मदत वळती करू नका

शासनाकडून लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर येणाऱ्या विविध योजनांचे पैसे, नुकसानभरपाई, विमा रक्कम शेतकऱ्यांना तत्काळ मिळावी, या रकमेतून कर्जवसुली करू नये. शेतकऱ्यांची शंभर टक्के ॲग्रीस्टॅकची नोंदणी पूर्ण करण्याच्या सूचना आमदार दिलीप बनकर यांनी दिल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com