Maharashtra River : राज्यातील ५५ नद्यांची खोरी नामशेष होण्याच्या मार्गावर

Eknath Shinde : विधानसभेतील लेखी उत्तरात मुख्यमंत्र्यांची माहिती
River
RiverAgrowon
Published on
Updated on

बाळासाहेब पाटील/ ॲग्रोवन वृत्तसेवा
Winter Session : नागपूर : प्रदूषित पाणी, जलपर्णी आणि इतर कारणांमुळे राज्यातील ५५ नद्यांची खोरी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, अशी माहिती राज्य सरकारने विधानसभेत उपस्थित करण्यात आलेल्या लेखी प्रश्नाच्या उत्तरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

यामिनी जाधव, भास्कर जाधव, नाना पटोले, अमिन पटेल यांच्यासह अन्य आमदारांनी राज्यातील नदी प्रदुषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. या प्रश्नाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या २०२०-२३ च्या अहवालानुसार अतिप्रदुषणामुळे नद्यांची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे.

तसेच वातावरणीय बदल, कमी पाऊस, मानवनिर्मित प्रदूषण, सांडपाणी, कंपन्यांमधील प्रक्रिया न केलेले रासायनिक पाणी, जलपर्णी या कारणांमुळे राज्यातील शेतीचे नुकसान होत असून नागरिकांचे व जलचरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच राज्यातील ५५ खोरी नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याची बाब सप्टेंबर २०२३ अखेर लक्षात आल्याचा प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नावर देण्यात आलेल्या लेखी उत्तरात ही बाब खरी असल्याचे सांगण्यात आले आहे.

River
Salt Production : पेणची मिठागरे नामशेष होण्याच्या मार्गावर

राज्यातील नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी, प्रदूषणामुळे होणाऱ्या आरोग्यविषयक समस्या सोडविण्यासाठी तेच प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या कंपन्या आणि दोषी अधिकाऱ्यांविरोधात काय कारवाई केली असाही प्रश्न उपस्थित केला. यावर हरित लवादाने दिलेल्या निर्देशानुसार १३ डिसेंबर, २०१८ रोजी नदी पुनरुत्थान समिती स्थापन केली असून राज्यातील ५३ प्रदूषित नद्यांचे आराखडे तयार करण्यात आले आहेत.

ते आराखडे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सादर करण्यात आले असून, त्याची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे उत्तरात सांगण्यात आले आह. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या वार्षिक अंदाजपत्रकात २५ टक्के रकमेची तरतूद सांडपाणी व नागरी घनकचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

सद्यःस्थितीत राज्यात १० हजार ५४७ दशलक्ष लिटर इतके सांडपाणी निर्माण होत असून त्यावर प्रक्रिया करण्याकरिता ७४११ दशलक्ष लिटर इतकी क्षमता असणारे १४९ सांडपाणी प्रक्रिया केंद्रे उभी करण्यात आली आहेत.

तसेच ३३६ दशलक्ष लिटर क्षमतेचे २७ घरगुती सांडपाणी प्रकिया केंद्रे नदी प्रदूषित पट्ट्यांमध्ये उभी करण्यात येणार आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी उत्तरात म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com