Cotton Farming: अनुभवानुसार कपाशी वाणाला प्राधान्य

Cotton Crop Planning: बार्शीटाकळी तालुक्यातील निंभारा येथील प्रगतशील शेतकरी गणेश नानोटे यांनी अनुभवाच्या आधारे कपाशी लागवडीत वाण निवड, खत नियोजन, सिंचन व पीक संरक्षणात सखोल नियोजन राबवले आहे. त्यांच्या पद्धती शाश्वत, कमी खर्चिक आणि परिणामकारक ठरत आहेत.
Cotton Farming
Cotton FarmingAgrowon
Published on
Updated on

Cotton Production Farming Management:

शेतकरी नियोजन । पीक : कपाशी

शेतकरी : गणेश श्‍यामराव नानोटे

गाव : निंभारा, ता. बार्शीटाकळी, जि. अकोला

एकूण शेती : ५० एकर

कपाशीचे क्षेत्र : १६ एकर

गणेश नानोटे यांचे १६ एकरांवर कपाशी लागवडीचे नियोजन आहे. कपाशी लागवडीमध्ये वाण निवड, खत व्यवस्थापन, तण नियंत्रण, सिंचन व्यवस्थापन, पीक संरक्षण आदी बाबींवर विशेष भर दिला जातो. केले. कपाशी लागवडीसाठी निवडलेली जमीन ही हलकी, मध्यम स्वरूपाची असून त्यानुसार कार्यवाही करण्यावर भर दिला जातो.

Cotton Farming
Cotton Farming : वाण संशोधनातील वाव

नियोजित क्षेत्रात मागील हंगामातील पीक अवशेष उदा. गव्हाचे काड, हरभरा कुटार, सोया कुटार, तुरीची धसकटे शेतातच कुजवले जातात. त्यासाठी रब्बी हंगामानंतर लगेच रोटर मारला जातो. त्याचा पिकांस चांगला फायदा होतो. या वर्षी १२ मेपासून सततच्या पूर्वमोसमी पावसामुळे तणांचा प्रादुर्भाव चांगलाच वाढला. त्यासाठी पुन्हा एकदा मशागत करून खरीप पेरणीसाठी शेत तयार केले, असे गणेश नानोटे सांगतात.

वाण निवड, लागवड

लागवडीसाठी वाण निवड करताना उत्पादनाबाबतचा पूर्वानुभव, कीड प्रतिकारकता, बोंडाचा आकार, वजन, फुलधारण क्षमता, वेचणीसाठी सुलभता या बाबींचा विचार केला जातो. लागवडीसाठी १५० ते १६० दिवसांत येणाऱ्या वाणांची निवड केली जाते. जेणेकरून या कालावधीनंतर कपाशी पिकाची काढणी करून रब्बी पिकांसाठी शेत तयार केले जाते.

या वर्षी शासकीय आवाहनानुसार एक जूनपासून मजुरांच्या मदतीने कपाशी पेरणी सुरू केली. लागवडीसाठी बैलचलीत तिफणद्वारे सऱ्या पाडून घेतल्या. सरीच्या एका बाजूने वरच्या भागात दीड ते दोन इंच खोलीवर बी रोवणी केली. या पद्धतीमुळे उगवणक्षमता चांगली येते. खाडे भरावे लागत नाहीत. कपाशीचे अंतर तीन बाय एक फूट ठेवण्यात आले आहे. यामध्ये झाडाची संख्या एकरी जवळपास १४ हजार रोपे बसली आहेत.

Cotton Farming
Cotton Farming : अभ्यासपूर्ण, तंत्रशुद्ध कापूस- आंतरपीक शेती

खत नियोजन

संपूर्ण हंगामात पिकास तीन वेळा रासायनिक खतांची मात्रा दिली जाते. पहिली डीएपी मात्रा पीक लागवडीनंतर १२ दिवसांनी डवऱ्याला सरते बांधून दिली जाईल. यामुळे मजुरी खर्च व वेळेत बचत साधता येते. दुसरी रासायनिक खतमात्रा १०ः२६ः२६, युरिया, सल्फर आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये पेरणीनंतर ३५ व्या दिवशी दिली जाईल.

तुषार सिंचनाचा वापर

कपाशी लागवडीसाठी तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब केला जातो. लागवडीनंतर लगेच पहिले पाणी दिले. सलग पाच ते सहा तास

सिंचन केले. त्यानंतर दर तीन दिवसांनी दोन ते तीन पाळ्या देण्यात आल्या. जेणेकरून मातीचा वरचा थर ओलसर राहील. कारण, शेताला भेगा पडल्यास रोप कोमेजण्याची शक्यता असते.

आगामी नियोजन

सध्या पीक लागवड होऊन १० दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. शेतात काही प्रमाणात तणांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सध्यातरी रासायनिक तणनाशक फवारणीची आवश्यकता वाटत नाही. तणनियंत्रणासाठी डवरणी केली जाते. आवश्यकतेनुसार मजूर लावले जाते.

पुढील दोन दिवसांत डीएपी या रासायनिक खताचा पहिला डोस दिला जाईल.

रोपे कोमेजू नयेत म्हणून नियमित सिंचनावर भर दिला जाईल.

- गणेश नानोटे, ९५७९१५४००४

(शब्दांकन : गोपाल हागे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com