Baramati Agricultural Protest : दूध आणि कांद्याच्या दरवाढीसाठी बारामतीत जोरदार आंदोलन!

Price Hike Demand : जोपर्यंत शेतकऱ्यांना कांदा व दुधाला दरवाढ मिळत नाही, तोपर्यंत शांततामय मार्गाने आंदोलन करत राहणार. मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन याच आठवड्यात भेटू, दरवाढ मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.
Agricultural Protest
Agricultural ProtestAgrowon
Published on
Updated on

Baramati News : जोपर्यंत शेतकऱ्यांना कांदा व दुधाला दरवाढ मिळत नाही, तोपर्यंत शांततामय मार्गाने आंदोलन करत राहणार. मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन याच आठवड्यात भेटू, दरवाढ मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.

कांदा व दुधाला दरवाढ मिळावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मंगळवारी (ता. ७) बारामती येथे आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी सुप्रिया सुळे बोलत होत्या. खासदार सुळे म्हणाल्या, की राज्यातील सत्तेच्या राजकारणात शेतकऱ्यांचे प्रश्न मागे पडले आहेत, संसदेत चर्चा होऊ शकली नाही, शेतकऱ्यांबद्दल सरकारची भूमिका कमालीची उदासीन वारंवार दिसते आहे.

Agricultural Protest
Farmer Protest : कर्जमाफीसह मेंढपाळांच्या प्रश्‍नावर बच्चू कडू करणार वाडा आंदोलन

या प्रश्नावर सहकार्याची भूमिका आहे, सरकारने बोलावले तर आमची चर्चेची तयारी आहे. सरसकट कर्जमाफीची आमची मागणी आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार आणि जोपर्यंत भाववाढ मिळत नाही तोवर शांततामय मार्गाने आंदोलन करत राहणार आहोत. न्याय मिळत नाही तोवर स्वस्थ बसणार नाही,असेही त्या म्हणाल्या.

युगेंद्र पवार म्हणाले, की बारामतीच्या जिरायती भागातील शेतकरी अडचणीत आहेत. त्यांच्या कांद्याला तसेच दुधालाही भाव मिळत नाही, ही अडचण शेतकऱ्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे दौऱ्याच्या वेळेस मांडली होती. शेतकऱ्यांचे हेच प्रश्न मार्गी लागण्यासाठी आम्ही आंदोलन करीत आहोत. सरकारला जाग यावी हीच या मागची भावना आहे. शरद पवार कृषिमंत्री होते तेव्हा शेतकऱ्यांच्या कृषी मालाला चांगले भाव मिळत होते, असेही ते म्हणाले.

Agricultural Protest
Farmers Protest : उच्चाधिकार समितीने घेतली जगजित डल्लेवाल यांची भेट

याप्रसंगी ॲड. एस. एन.जगताप, वनीता बनकर, आरती शेंडगे, संदीप गुजर, सत्यव्रत काळे, प्रियांका शेंडकर, प्रशांत बोरकर, राजेंद्र जगताप, जयकुमार काळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. दूध उत्पादकांनी दूध ओतून निषेध न करता दुधाच्या पिशव्या व कांदा बारामतीकरांना मोफत देत आंदोलन केले. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केल्याचे सुप्रिया सुळे यांनी नमूद केले.

‘व्यवसायाला हेअरकट मिळतो, शेतकऱ्यांना का नाही’

एनपीए खाते झाल्यावर बँका हेअरकट देतात, त्याप्रमाणे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी का दिली जात नाही, असा सवाल संसदेत उपस्थित करणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी नमूद केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com