Soybean Buying Process : बारदाना अभावामुळे सोयाबीन खरेदीला थोडा ब्रेक

Soybean Market : किंमत आधार योजनेअंतर्गत हमीभावाने (प्रतिक्विंटल ४८९२ रुपये) राज्य सहकरी पणन महासंघ अंतर्गत परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील २६ केंद्रांवर शुक्रवार (ता. २७)पर्यंत ८ हजार १९२ शेतकऱ्यांचे १ लाख ६३ हजार ४५६ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले.
Soybean Market
Soybean MarketAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : किंमत आधार योजनेअंतर्गत हमीभावाने (प्रतिक्विंटल ४८९२ रुपये) राज्य सहकरी पणन महासंघ अंतर्गत परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील २६ केंद्रांवर शुक्रवार (ता. २७)पर्यंत ८ हजार १९२ शेतकऱ्यांचे १ लाख ६३ हजार ४५६ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले.या सोयाबीनची किंमत ७९ कोटी ९६ लाख २६ हजार ६४४ रुपये होते.

त्यापैकी २५ केंद्रावरील ४ हजार ४८१ शेतकऱ्यांना ९७ हजार ४५३ क्विंटल सोयाबीनचे ४७ कोटी ६७ लाख ४८ हजार २४५ रुपये चुकारे अदा करण्यात आले आहेत. परंतु अनेक केंद्रांवर बारदाना नसल्यामुळे सोयाबीन खरेदी बंद आहे, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी कुंडलिक शेवाळे यांनी दिली.

Soybean Market
Soybean Sale : सोयाबीन विक्रीसाठी मुदत वाढवावी ; शेतकऱ्यांची मागणी

परभणी जिल्ह्यात १२ खरेदी केंद्रांवर सोयाबीन विक्रीसाठी १५ हजार ८१५ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी असून, ११ खरेदी केंद्रावर २ हजार ९०७ शेतकऱ्यांचे ५५ हजार १८९ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले.या सोयाबीनची किंमत २६ कोटी ९९ लाख ८५ हजार ४४४ रुपये होते. त्यापैकी १० केंद्रांवरच्या १ हजार ९९४ शेतकऱ्यांना ३८ हजार ९४१ क्विंटल सोयाबीनचे १९ कोटी ५ लाख २ हजार ६९८ रुपये चुकारे अदा करण्यात आले.

हिंगोली जिल्ह्यातील १५ खरेदी केंद्रांवर १८ हजार ५५४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, ५ हजार २८५ शेतकऱ्यांचे १ लाख ८ हजार २६७ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले.या सोयाबीनची किंमत ५२ कोटी ९६ लाख ४४ हजार १२० रुपये होते. सर्व १५ केंद्रांवरच्या२ हजार ४८७ शेतकऱ्यांना ५८ हजार ५१२ क्विंटल सोयाबीनचे २८ कोटी ६२ लाख ४५ हजार ५४७ रुपये चुकारे अदा करण्यात आले.

Soybean Market
Soybean Seed MSP : रिजेक्ट सोयाबीन बियाण्यांना हमीभाव मिळवून द्या

बारदाना नसल्यामुळे खरेदी खोळंबली...

परभणी जिल्ह्यातील सेलू, मानवत, बोरी, वरपुड, रूढी पाटी, हिंगोली जिल्ह्यातील वारंगा, सेनगाव, साखरा केंद्रावर खरेदी केलेले सोयाबीन साठविण्यासाठी बारदाना नाही. त्यामुळे सोयाबीनची खरेदी खोळंबली आहे. शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे बारदाना उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

सोयाबीन चुकारे अदायगी स्थिती (सोयाबीन क्विंटलमध्ये)

खरेदी केंद्र सोयाबीन शेतकरी संख्या चुकारे रक्कम

परभणी ४४०७ १८८ २ कोटी १५ लाख ५९ हजार ९२४ रुपये

पेडगाव ५२०२ २२८ २ कोटी ५४लाख ४८ हजार १८४ रुपये

जिंतूर १६४५ ८८ ८० लाख ४९ हजार ७८६रुपये

बोरी २६५२ १९२ १ कोटी २९ लाख ७३हजार ५८४रुपये

सेलू ९००९ ५१८ ४ कोटी ४० लाख ७२ हजार २८ रुपये

मानवत २४७६ १२९ १ कोटी २१ लाख १२हजार ५९२ रुपये

पाथरी ३५९८ १८७ १कोटी ७६ लाख १ हजार ४१६ रुपये

सोनपेठ ५६१३ २२४ २ कोटी ७४ लाख ५८ हजार ७९६रुपये

पूर्णा २८८८ १६० १ कोटी ४१ लाख २८ हजार ९६ रुपये

हिंगोली २८४९ ११२ १ कोटी ३९ लाख ३९ हजार ७५४ रुपये

कनेरगाव ७०६९ २२८ ३ कोटी ४५ लाख ८३ हजार ९५४ रुपये

फाळेगाव ४२९८ १३८ २ कोटी १० लाख २८ हजार २६२ रुपये

कळमनुरी ५४०६ २३७ २ कोटी ६४ लाख ४८ हजार ५९८रुपये

वारंगा ३७९२ १६७ १ कोटी ८५ लाख ५० हजार ४६४ रुपये

वसमत ३७०२ १९४ १ कोटी ८१ लाख १२ हजार ५८१ रुपये

जवळा बाजार ५६६६ २५६ २ कोटी ७७ लाख १८ हजार ७२ रुपये

येळेगाव ३४६४ १२८ १ कोटी ६९ लाख ४५ हजार ८८८ रुपये

सेनगाव ७००३ २५२ ३ कोटी ४२ लाख ६१ हजार ११२ रुपये

साखरा १६४९ ११८ ८० लाख ६६ हजार ९०८ रुपये

शिवणी खुर्द १७७७ १७६ .८६ लाख ९५ हजार ५३० रुपये

नागासिनगी ४४८२ २११ २ कोटी १९ लाख २८ हजार २६२ रुपये

आडगाव ३६०२ १२८ १कोटी ७६ लाख २० हजार ९८४ रुपये

उमरा ८७० ४० ४२ लाख ५६ हजार ४० रुपये

पुसेगाव २८८० १०२ १कोटी ४० लाख ८८ हजार ९६० रुपये

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com