Banana Chilling Issue : वाढत्या थंडीमुळे केळीवर ‘चिलिंग’ची समस्या

Cold Wave Increase Update : थंडी वाढल्यामुळे केळीच्या फळांवर ‘चिलिंग’ची समस्या दिसू लागली आहे. त्यामुळे केळी पिकल्यानंतर त्यावर पिवळसर रंगाची चमक कमी दिसते.
Banana Chilling Issue
Banana Chilling IssueAgrowon
Published on
Updated on

Solapur News : थंडी वाढल्यामुळे केळीच्या फळांवर ‘चिलिंग’ची समस्या दिसू लागली आहे. त्यामुळे केळी पिकल्यानंतर त्यावर पिवळसर रंगाची चमक कमी दिसते. परिणामी, व्यापाऱ्यांकडून कमी दराने केळी खरेदी केली जाईल, या भीतीने शेतकरी त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र काही कृषी निविष्ठा कंपन्या व त्यांचे प्रतिनिधी यावर उपाय असल्याचे सांगून काही निविष्ठा आमच्या माथी मारत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

‘चिलिंग’च्या समस्येमुळे केळीच्या सालीच्या आतमध्ये लालसर रंगाचे ठिपके दिसतात. त्यामुळे केळी पिकल्यावर त्याच्या सालीवर पिवळसर चमक कमी राहते. सोलापूर जिल्ह्यात केळीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. ‘चिलिंग’ समस्या रोखण्यासाठी शेतकरी हजारो रुपयांची उत्पादने फवारणी किंवा ड्रीपद्वारे केळी पिकाला देतात.

Banana Chilling Issue
Cold Wave In Maharashtra : राज्यातील ७ जिल्ह्यात थंडीची लाट; पावसाच्या हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता

परंतु यामुळे ‘चिलिंग’ची समस्या कमी होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. परिणामी शेतकऱ्यांना खर्चाची आर्थिक झळ बसते आहे. प्रत्येक वर्षी थंडीमध्ये नवनवीन कंपन्या ‘चिलिंग’वर उपाय असल्याचे सांगून आमची फसवणूक करतात असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. हे चक्र मागील कित्येक वर्षांपासून चालू आहे.

Banana Chilling Issue
Weekly Weather : राज्यात थंडी वाढण्याची शक्यता

थंडीत उद्भवणारी ‘चिलिंग’ची समस्या कमी व्हावी यासाठी विशिष्ट वनस्पतीची कुंपण बागेभोवती करावे. पहाटे बागेमध्ये शेकोट्या पेटवून तापमान थोडे वाढल्याने काही प्रमाणात फायदा होऊ शकतो.

‘...तरीही समस्या उद्भवलीच’

बागेला पहाटे पाणी दिल्याने पांढरी मुळी कार्यक्षम राहून झाड चांगल्या प्रकारे अन्नद्रव्य घेऊ शकते, असा अनुभव माळीनगर येथील शेतकरी केशव थोरात यांनी सांगितला. तर महाळुंगचे शेतकरी विनीत पांढरे म्हणाले, की मागील वर्षी मी दोन एकर केळीच्या बागेत ‘चिलिंग’ होण्याआधीच साडेतीन हजार रुपये खर्चून पाच लिटरचे चार कॅन या प्रमाणात एक उत्पादन ड्रीपद्वारे बागेला सोडले होते. त्याचा काहीच परिणाम झाला नाही. तरीही ‘चिलिंग’ची समस्या उद्भवलीच.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com