Beed News : ‘‘प्रचंड मेहनत आणि प्रयत्न करून दुष्काळात केळीचे पीक घेतले. आधी अपुऱ्या पाऊस काळाने मारलं, पण त्यावर मात केली. आता चार दोन दिवसांत केळी काढली असती, पण वादळ, गारपिटीने मोठ नुकसान केलं. सारी केळी भुईसपाट झाली.
आता शासनाने खर्च भरून निघेल इतकी तरी भरपाई द्यावी,’’ अशी व्यथा कांदेवाडीच्या बालासाहेब कांदे यांनी केली. धारूर तालुक्यातील कांदेवाडीसह हिंगणी बु, देव दहिफळ, चिखली, फकीर जवळा, सुकळी, जैतापूर आदी परिसरात तीन दिवसांपूर्वी वादळी पाऊस, गारपिटीने, आंबा, केळी, डाळिंब, मोसंबी, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान केले.
कांदेवाडीत नुकसान झालेल्या केळी उत्पादक कांदे यांच्या मुलीचे लग्न चार दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. नेमके आर्थिक गरजेवेळी त्यांच्या केळी बागेचे मोठे नुकसान झाले.
कांदेवाडीतील विष्णू खाडे, सुरेखा खाडे, छगन कांदे, कुशाबा कांदे, रमेश खाडे यांचे केळीचे तर महादेव कांदे यांचे आंबा व जनकराज कांदे यांच्या सीताफळ बागेचे नुकसान झाले. आता मदतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.
विष्णू खाडे म्हणाले, ‘‘आधी पाऊस काळ कमी झाल्याने पाच किलोमीटरवरून विकत पाणी आणून बागा जगविल्या. बाग १५ लाखांना व्यापाऱ्याला दिली होती. मात्र नुकसान झाल्याने तो आता नेईल तरी काय, त्यामुळे तो फोनही उचलत नाही. आता सरकारकडूनच मदतीची आशा आहे.’’
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.