Fodder Transfer Ban : सांगलीअंतर्गत, अन्य जिल्ह्यांत चारा विक्री, वाहतुकीवर बंदी

Fodder Shortage : १२ लाख ८४ हजार ४८३ टन जनावरांना चारा उपलब्ध झाला आहे. नोव्हेंबरच्या तुलनेत १ लाख ४ हजार १२५ टनांनी चारा वाढला आहे.
Fodder Shortage
Fodder ShortageAgrowon
Published on
Updated on

Sangli News : सांगली जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागामार्फत ४१ हजार ८१६ किलो चारा बियाणे वाटप केले आहे. त्यामुळे १२ लाख ८४ हजार ४८३ टन जनावरांना चारा उपलब्ध झाला आहे. नोव्हेंबरच्या तुलनेत १ लाख ४ हजार १२५ टनांनी चारा वाढला आहे. त्यामुळे पशुपालकांना दिलासा मिळाला आहे. भविष्यात चाराटंचाई भासू नये यासाठी आंतर जिल्हा आणि सीमावर्ती जिल्ह्यात चारा विक्री आणि वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे.

जिल्ह्यात शेतीबरोबरच दुग्ध व्यवसाय केला जातो. दुधाचे अर्थकारण मोठे आहे. जिल्ह्यात १४ लाख ३ हजार ६३३ जनावरांची नोंद आहे. जत तालुक्यात सर्वाधिक जनावरांची संख्या आहे. मोठ्या जनावरांना प्रतिदिन १५ किलो, तर छोट्या जनावरांना ६ किलो चाऱ्याची गरज असते. त्यामुळे जिल्हा पशुसंर्वधन विभागाने नोव्हेंबरमध्ये प्रतिदिन लहान व मोठ्या जनावरांना किती चारा लागतो आणि चाऱ्याची उपलब्धता आहे, याची माहिती संकलित केली. त्यानुसार जिल्ह्यात दररोज जनावरांना २५ हजार २६५ टन चारा लागतो. नोव्‍हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ११ लाख ८० हजार ३५८ टन चारा उपलब्ध होता. अर्थात हा चारा एक ते दोन महिने पुरेल इतकाच होता.

Fodder Shortage
Fodder Transfer Ban : नाशिकमधून चारा दुसऱ्या जिल्ह्यात नेण्यास बंदी

पशुसंवर्धन विभागाने ज्वारी आणि मका बियाण्यांचे शंभर टक्के अनुदानावर वाटप केले. पहिल्या टप्प्यात ३० लाखांचे ६ हजार ८१६ किलो ज्वारी तर दुसऱ्या टप्प्यात ७० लाखांचे ३५ हजार किलो मका बियाणे वाटप केले. तसेच जिल्ह्यात ३७७ टन मुरघास उपलब्ध आहे. त्यामुळे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात चाऱ्याची उपलब्धता वाढली आहे. सध्या १२ लाख ८४ हजार ४८३ टन चारा उपलब्ध आहे. त्यामुळे हा चारा एक ते तीन महिन्यापर्यंत पुरवता येईल.

Fodder Shortage
Electricity Bill : २४ तास कृषी पंपाला वीज पुरवठा करण्यावरून पटोलेंची फडणविसांना कोपरखळी!

जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा इतर जिल्ह्यांत आणि सीमेवरील जिल्ह्यांत विक्रीसाठी पाठवला जात आहे. त्यामुळे भविष्यात चाराटंचाई भासणार आहे. यामुळे चाऱ्याची कमतरता भासू नये यासाठी आंतरजिल्हा व इतर जिल्ह्यांत चारा वाहतुकीवर गुरुवारपासून (ता. २९) ते २८ एप्रिलपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय जनावरांची संख्या व उपलब्ध प्रतिदिन लागणारा चारा दृष्टीक्षेप

तालुका पशुधन संख्या उपलब्ध चारा (टनांत) दिवस

आटपाडी १,४९,८१७ ८६,९१० ५७

जत ३,५४,७६५ ३,४९,०५० ९४

तासगाव १,२५,३५३ ६१,०२४ ३९

खानापूर ९६,५३२ ९३,२५९ ८०

कवठेमहांकाळ १,४०,९९२ १,००,४४९ ९३

कडेगाव ८१,०९८ १,०४,४१७ १०२

मिरज १,४३,८९३ १,८१,३६७ ९९

पलूस ७३,९३१ ६९,२३८ ७१

शिराळा ८१,१३५ ६२,२७३ ५४

वाळवा १,६५,११७ १,७६,४९५ ८४

एकूण १४,०३,६३३ १२,८४,४८३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com