Kolhapur Agriculture News : कोल्हापूर जिल्ह्यातील चिकोत्रा प्रकल्प चिकोत्रा नदीच्या भागामध्ये शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या उपसा यंत्रावर उपसाबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. कोल्हापूर पाटबंधारे विभाग (दक्षिण) उप कार्यकारी अभियंता शिल्पा मगदुम यांनी याबाबत माहिती दिली आहे.
दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात दोन तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. याचबरोबर पाणी टंचाईच्या झळा आता कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्याच तालुक्यांमध्ये दिसून येत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, उपसाबंदी क्षेत्र चिकोत्रा नदी कोल्हापूर पद्धतीचा बंधारा १ ते को.प.बंधारा २९ (बेळुंकी) कालावधी- २८ ऑक्टोबर ते ०६ नोव्हेंबर, २७ नाव्हेंबर ते ०६ डिसेंबर तसेच २७ डिसेंबर ते ०५ जानेवारी, २६ जानेवारी ते ०४ फेब्रुवारी, २५ फेब्रुवारी ते ०६ मार्च, २५ मार्च ते ०३ एप्रिल, २२ एप्रिल ते ०१ मे व १६ ते २८ मे या कालवधीत उपसाबंदी लागू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
उपसाबंदी कालावधीत पाण्याचा अनाधिकृत उपसा आढळून आल्यास संबंधित उपसा यंत्र जप्त करुन परवानाधारकाचा उपसा परवाना ०१ वर्षाच्या कालावधीसाठी रद्द करण्यात येणार आहे. तसेच होणाऱ्या नुकसानीस पाटबंधारे विभाग जबाबदार राहणार नसल्याची माहिती श्रीमती मगदुम यांनी दिली.
हातकणंगले आणि गडहिंग्लज तालुक्यतात दुष्काळ
राज्यातील ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली भीषण परिस्थिती लक्षात घेता या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात हा दुष्काळ जाहीर करण्यात आला. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज आणि हातकणंगले तालुक्यांचा मध्यम दुष्काळी गटात समावेश करण्यात आला.
दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यांत ज्या मंडळांमध्ये कमी पाऊस झाला आहे. त्याबाबतीत आवश्यक ते निकष निश्चित केले जातील. तिथे दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करून योग्य सवलती देण्यासाठी मदत व पुनर्वसनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे निर्देशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.