Bamboo Cultivation : सातारा जिल्ह्यात ७०.५४ हेक्टरवर बांबू लागवड

Bamboo Farming : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात बांबू लागवडीवर विशेष भर देण्यात आला आहे. या वर्षासाठी पाच हजार हेक्टरवर बांबू लागवडीचे उद्दिष्ट ठेवून काम सुरू केले आहे.
Bamboo Cultivation
Bamboo CultivationAgrowon
Published on
Updated on

Satara News : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात बांबू लागवडीवर विशेष भर देण्यात आला आहे. या वर्षासाठी पाच हजार हेक्टरवर बांबू लागवडीचे उद्दिष्ट ठेवून काम सुरू केले आहे. ३३३९ हेक्टर क्षेत्रावरील लागवडीस प्रशासकीय मान्यता दिली आहे. पावसाच्या अडचणीमुळे बांबू लागवडीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

यावर्षी कमी पर्जन्यमानाचा फटका जिल्ह्यातील बांबू लागवडीच्या उद्दीष्टाला बसण्याची शक्यता आहे. यावर्षासाठी पाच हजार हेक्टरवर बांबू लागवडीचे उद्दीष्ट पूर्ण करायचे आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सामाजिक वनीकरण, कृषी विभाग, ग्रामपंचायत विभाग (जिल्हा परिषद), विभागून देण्यात आले आहे.

Bamboo Cultivation
Bamboo Cultivation : बांबू लागवड तंत्रज्ञानाचा अभ्‍यासक्रमात समावेश

जिल्ह्यात १७४४ गावे असून प्रत्येक गावात दोन हेक्टरप्रमाणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी बांबू लागवडीचे नियोजन केले आहे. यामध्ये प्रत्येक कृषी सहायकाला दहा हेक्टर तर प्रत्येक ग्रामसेवकाला दहा हेक्टरचे उद्दिष्ट दिले आहे. यानुसार कृषी विभागाकडे १७७६, सामाजिक वनीकरण ६५ हेक्टर, गटविकास अधिकारी जिल्हा परिषद यांना २०१७ हेक्टर असे एकूण ३५५८ हेक्टरचे प्रस्ताव प्राप्त जिल्हा प्रशासनास प्राप्त झाले आहेत.

यापैकी ३३३९ हेक्टरवरील प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता दिली गेली आहे. तर आतापर्यंत ७०.५४ हेक्टरवर बांबू लागवड पूर्ण झाली आहे. त्यासाठी ७६ हजार ६२९ बांबू रोपांचा वापर करण्यात आला आहे. आता सध्या जिल्ह्यात पाणीटंचाई असल्याने बांबू लागवडीवर याचा परिणाम दिसणार आहे. आता जूनमध्येच बांबू लागवड करावी लागणार आहे. सध्या पाण्याची उपलब्धता नसल्याने लागवड केलेली बांबू रोपे जगविण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.

Bamboo Cultivation
Bamboo Farming : पर्यावरण रक्षणासाठी बांबूचा आधार

जनजागृतीची गरज

जिल्ह्यात बांबू लागवडीबाबत म्हणावी तेवढी जागृती झालेली नाही. कुटुंब विभाजनामुळे जमिनीचे तुकडे झाले आहेत. त्याचा परिणाम ही बांबू लागवड योजनेवर दिसणार आहे. लागवडीसाठी जेवढे प्रयत्न होत आहेत. मात्र, विक्री कुठे, कशी होणार याबाबतची शेतकऱ्यांत जागृती केली जात नाही. योजना प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी लागवडीपासून विक्रीपर्यंतची जागृती करण्याची गरज आहे.

हेक्टरी सहा लाखांवर अनुदान

बांबूलागवड दहा गुंठ्यांपासून एक हेक्टरपर्यंत करता येते. त्यासाठी मनरेगाअंतर्गत हेक्टरी सहा लाख ९९ हजार रुपये अनुदान मिळणार आहे. हे बहुद्देशीय पीक असून यातून पूरक व्यवसाय मिळावा म्हणून शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. बांबूपासून १८०० प्रकारच्या वस्तू बनविल्या जात आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com