Sustainable Farmer Income: सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यात बांबू लागवडीला प्रोत्साहन दिल्यास शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा सक्षम आणि शाश्वत स्रोत निर्माण होऊ शकतो. त्यामुळे बांबू लागवडीचा प्रसार करण्यासाठी विशेष शेतकरी मेळावे आयोजित करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिल्या..जिल्ह्यातील उद्योग, रोजगारनिर्मिती आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम जिल्हास्तरीय कार्यबल समिती, जिल्हा उद्योग मित्र समिती आणि आजारी उद्योग पुनर्वसन समितीची संयुक्त आढावा बैठक जिल्हाधिकारी धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत उद्योग विकासाबरोबरच बांबू लागवडीच्या संभाव्यतेवर सविस्तर चर्चा करण्यात आली..Bamboo Cultivation: बांबू लागवडीतून ग्रामीण अर्थव्यवस्थेला हातभार.बैठकीत जिल्हास्तरावर बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी नियोजनबद्ध उपक्रम राबविण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. यासाठी जिल्हास्तरीय बांबू मिशन समिती स्थापन करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली..Bamboo Cultivation: बांबू लागवड शेतकऱ्यांसाठी सक्षम पर्याय.तसेच शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी विशेष मेळावे आयोजित करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. दिव्यांग युवक-युवतींना विविध कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सहभागी करून त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी वाढविणे आणि स्वावलंबनाला चालना देण्याबाबतही त्यांनी संबंधित यंत्रणांना निर्देश दिले..औद्योगिक क्षेत्राचे प्रभावी नियोजन करण्यासाठी एमआयडीसीमधील उद्योगांचा अद्ययावत माहिती संच तयार करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या. सिंधुदुर्गमधील कॉयर (नारळ काथ्या) आधारित उत्पादनांची गुणवत्ता लक्षात घेता त्यांना भौगोलिक मानांकन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. बैठकीला जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले, मोहन होडावडेकर, ॲड. नकुल पार्सेकर, श्रीधर ओगले आदी उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.