Sugarcane Irrigation : ऊस पिकाला संतुलित पाणीपुरवठा

Sugarcane Farming : जोमदार वाढीच्या अवस्थेमध्ये उसास योग्य प्रमाणात पाण्याचा पुरवठा होणे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण या अवस्थेमध्ये उंची, कांड्यांची लांबी व जाडी वाढत असते. याचा प्रत्यक्ष परिणाम उसाचे वजन वाढण्यावर होतो.
Sugarcane
Sugarcane Agrowon
Published on
Updated on

Sugarcane Farming Management : सुरुवातीच्या ऊस उगवणीच्या अवस्थेमध्ये आणि कोंब स्थिर होण्याच्या कालावधीत हलके परंतु वारंवार पाणी देणे महत्त्वाचे आहे.सुरुवातीच्या काळात जमीन फक्त ओली असणे महत्त्वाचे आहे. जमिनीत हवा खेळती असावी. सुरुवातीच्या काळात पाण्याचा ताण असेल तर जमीन कोरडी राहते, त्यामुळे उगवण उशिरा व कमी प्रमाणात होते. पाण्याचा जास्त प्रमाणात वापर झाल्यास आणि शेतात पाणी साचल्यास उसावरील डोळे कुजतात. उगवून आलेले कोंब मरतात, उगवणीचे प्रमाण कमी राहते. यामुळे अपेक्षित ऊस संख्या मिळत नाही.

मुळांची वाढ आणि पाणी शोषण्याची क्रिया

पोषक वातावरणात ऊस लागण केल्याच्या तिसऱ्या दिवसापासून उसावरील डोळे फुगू लागतात. कांडीला मुळ्या सुटण्यास सुरुवात होते.

सेटरूट्सची वाढ झपाट्याने म्हणजे २४ मिमि प्रति दिन या वेगाने होते. या मुळांची लांबी १५० ते २५० मिमी झाल्यानंतर वाढ थांबते. मुळे कालांतराने काळी होतात, कुजून जातात. लागणीनंतर आठ आठवड्यांनी नाहीशी होतात.

उसाच्या उगवणीबरोबरच जमिनीमध्ये शूट रूट्स निघायला सुरुवात होते. पहिली निघालेली शूट रूट्स सेट रूट्सच्या मानाने जाड असतात. शूट रूट्स जमिनीमध्ये वेगाने वाढतात. यानंतर त्यास फांद्या येऊन झपाट्याने त्यांची वाढ होते.

Sugarcane
Sugarcane Irrigation : पूर्वहंगामी उसासाठी ठिबक सिंचनाचे नियोजन

शूट रूट्स वाढण्याचा जास्तीत जास्त वेग ७५ मिमि प्रति दिन इतका सुरुवातीच्या एक दोन दिवसांत असतो. त्यानंतर एक आठवड्याने तो ४० मिमी प्रति दिन इतका असतो.

जमिनीमध्ये मुळांचा विस्तार हा जमिनीच्या भौतिक गुणधर्मावर, केलेल्या मशागतीवर व ओलाव्याच्या प्रमाणावर अवलंबून असतो. उदा. ३० सेंमी खोलीमध्ये ४८ ते ६८ टक्के मुळे, ३० ते ६० सेंमी खोलीवर १६ ते १८ टक्के मुळे, ६० ते ९० सेंमीवर ३ ते १२ टक्के मुळे, ९० ते १२० सेंमीवर ४ ते ७ टक्के मुळे, १२० ते १५० सेंमीवर १ ते ७ टक्के मुळे आणि १५० ते १८० सेंमी खोलीवर ० ते ४ टक्के मुळे असतात.

ऊस पिकाचे जमिनीच्या खोलीनुसार पाण्याचे शोषण

जमिनीची खोली सेंमी पाण्याचे शोषण (टक्के)

० - २० ६२.०

२० - ४० २३.४

४० - ६० ८.८

६० - ८० ४.४

८० - १०० १.४

Sugarcane
Sugarcane Irrigation Management : आडसाली उसासाठी ठिबक सिंचनाचे नियोजन

पूर्वहंगामी ऊस पिकात ठिबक सिंचन आणि सरी - वरंबा पद्धतीचा तुलनात्मक अभ्यास केला असता मिळालेले निष्कर्ष

तपशील सरी वरंबा पद्धत पृष्ठभागावरील ठिबक सिंचन पद्धत पृष्ठभागाखालील

ठिबक सिंचन पद्धत ठिबक सिंचन वापरल्याचे फायदे

उसासाठी एकूण देण्यात आलेले पाणी (हे. सेंमी.) ३०० ते ३१० १५० ते १६० १४० ते १४५ ५० ते ५५ टक्के पाण्यात बचत

ऊस उत्पादन (टन /हे.) ११० ते १२० १४५ ते १५५ १५५ ते १७० ३० ते ३५ टक्के उत्पादनात वाढ

पाणी वापर क्षमता

(टन / हे. सेंमी.) ०.३५ ते ०.४० ०.८० ते १.० १ ते १.२० सरी वरंबा पद्धतीच्या तुलनेत ठिबक सिंचनाची पाणी वापर क्षमता २.२५ ते २.५० पट जास्त

पाणी देण्याची कार्यक्षमता ४५ ते ५० टक्के ८८ ते ९२ टक्के ९० ते ९५ टक्के पाणी देण्याच्या कार्यक्षमतेत ३५ ते ४५ टक्के वाढ

रासायनिक खत मात्रा :

(किलो / हे.) ३४०: १७०: १७० २४० : १२० : १२० २४० : १२० : १२० खतमात्रेत ३० टक्के बचत

योग्य लागण पद्धत लांब सरी पद्धत १.५ ते १.८ मी. अंतरावरील लांब

सरी पद्धत. जोड ओळ पद्धत : ०.४५ ते ०.६० मी. दोन ओळीतील अंतर आणि दोन जोड ओळीतील अंतर १.५ ते १.८ मी. जास्त अंतरावरील किंवा जोड ओळ पद्धतीमुळे ऊस तोडणीवेळेस अपेक्षित ऊस संख्या

( १,००,००० / हे.)

टीप ः आपल्या भागातील बाष्पीभवनाचा वेग, ऊस वाढीची अवस्था यानुसार ठिबक सिंचनाखाली योग्य प्रमाणात पाणी दिल्यास निश्‍चितपणे सरी-वरंबा सिंचन पद्धतीच्या तुलनेत ५० ते ५५ टक्के पाण्याची बचत होऊन उत्पादनात ३० ते ३५ टक्के वाढ मिळेल.

पूर्वहंगामातील उसाची ठिबक सिंचनाखाली महिनावर पाण्याची गरज

महिना लागणीनंतर दिवस पीई

(मिमि./ दिन) के पॅन पीक गुणांक इटीसी

(दरदिवशी पाण्याची गरज लि./दिन/एकर ) दर दिवशी ठिबक चालविण्याचा कालावधी (मिनिटे)

ऑक्टोबर ३० ७.५ ०.८ ०.४ ९६०० ४५

नोव्हेंबर ६० ६ ०.८ ०.५ ९६०० ४५

डिसेंबर ९० ५ ०.८ ०.६ ९६०० ४५

जानेवारी १२० ५.५ ०.८ ०.७ १२,३२० ६०

फेब्रुवारी १५० ६ ०.८ ०.८ १५,३६० ७०

मार्च १८० ७ ०.८ ०.९ २०,१६० ९५

एप्रिल २१० ८ ०.८ १.० २५,६०० १२०

मे २४० ८.५ ०.८ १.१ २९,९२० १३५

जून २७० ७ ०.८ १.१ २४,६४० ११५

जुलै ३०० ६ ०.८ १.१ २१,१२० १००

ऑगस्ट ३३० ६.५ ०.८ १.१ २२,८८० १०५

सप्टेंबर ३६० ६ ०.८ १.० १९,२०० ९०

ऑक्टोबर ३९० ७.५ ०.८ ०.८ १९,२०० ९०

नोव्हेंबर ४२० ६ ०.८ ०.७ १३,४४० ६५

टीप : १) वरील तक्ता उसामध्ये पाच फूट अंतरावर ड्रीपलाइन आणि ४० सेंमी अंतरावर ड्रीपर आणि २ लि./ तास ड्रीपरचा प्रवाह लक्षात घेऊन तयार केला आहे. २) आपापल्या भागातील बाष्पीभवनानुसार पाण्याची गरज बदलते.

अरुण देशमुख, ९५४५४५६९०२ (उपसरव्यवस्थापक व प्रमुख, कृषी विद्या विभाग, नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रा. लि., पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com