Fertilisers Rate : खते, अवजारांवरील ‘जीएसटी’मुळे शेतकरी आला घाईला, ठिबक सिंचन साहित्य विक्रीतही घट

Sugarcane Production : पश्चिम महाराष्ट्रात मुख्य पीक ऊस पीक घेतले जाते. सोयाबीन, भुईमूग, भात, ज्वारी अशी पिके घेतली जातात.
Fertilisers Rate
Fertilisers RateAgrowon
Published on
Updated on

Farmers Crop GST : केंद्र, राज्य शासन सूक्ष्म सिंचनासाठी प्रोत्साहन देत आहे. दुसरीकडे सूक्ष्म सिंचन संचांवर १८ टक्के ‘जीएसटी’ लावल्याने ठिबक आणि तुषार सिंचनावरील खर्चात वाढ झाली आहे. पूर्वी सूक्ष्म सिंचनावर ६ टक्के मूल्यवर्धित कर (व्हॅट) होता. आता थेंब थेंब पाणी वाचवण्यासाठीही शेतकऱ्यांवर एकरी चार हजारांचा भार पडत आहे. एकूणच खते, ट्रॅक्टर व अवजारांवरील ‘जीएसटी’मुळे शेतीवर आर्थिक ताण वाढला आहे.

ठिबक सिंचन साहित्य विक्रीतही ४० टक्के घट झाली आहे. परिणामी ठिबक सिंचनापासून शेतकरी लांब जात असून यामुळे अतिपाणी वापर होत आहे. अतिवृष्टी, महापूर, नैसर्गिक आपत्तीत कमी उत्पादन मिळते आणि उत्पादन खर्च वाढला असून शेतमालास मिळणाऱ्या कमी दरामुळे शेतकऱ्यांना शेती व्यवसाय तोट्याचा झाला आहे. त्यामुळे निविष्ठांवरील ‘जीएसटी’ सरसकट रद्द करण्याची मागणी होत आहे.

पश्चिम महाराष्ट्रात मुख्य पीक ऊस पीक घेतले जाते. सोयाबीन, भुईमूग, भात, ज्वारी अशी पिके घेतली जातात. पिकांचा उत्पादन खर्च व त्या खर्चाच्या ५० टक्के नफा, इतका हमीभाव देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली होती. खते, कीटकनाशके आणि शेती अवजारांवरील ‘जीएसटी’ शेतकऱ्यांकडून वसूल केला जातो. उसापासून शासनाला कर रूपाने कोट्यवधी रुपये मिळतात.

याउलट उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेकदा कमी उत्पादन होऊनही बाजारात शेतमालाला भाव मिळत नाही. यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत सापडल्याची वस्तूस्थिती आहे. खतांवर ५ टक्के तर कीडनाशकांवर १८ टक्के सरसकट ‘जीएसटी’ आकारला जातो. पूर्वीपेक्षा खते आणि कीटकनाशक औषधांच्या किमती दुपटी, तिपटीने वाढल्या आहेत.

Fertilisers Rate
Kolhapur Rain Alert : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट

युरिया, डीएपी या मुख्य अन्नद्रव्यांना पाच टक्के, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांना १२ टक्के, तर कीडनाशकांवर १८ टक्के ‘जीएसटी’ आकारला जातो. ट्रॅक्टर आणि त्याच्या उपकरणांवर ६ टक्के मूल्यवर्धित कर (व्हॅट) आकारला जात होता. ‘जीएसटी’मध्ये १२ ते १८ टक्के कर आहे. त्यामुळे ही उपकरणे महागली आहेत.

खत दरवाढीने शेतकरी मेटाकुटीस

खतांच्या किमती कमी होणे अपेक्षित होते. पण, सल्फ्युरिक अॅसिड आणि अमोनियासारख्या खतांच्या निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या निविष्ठा, कच्च्या मालावर १८ टक्के दराने ‘जीएसटी’ लावल्याने खतांचे दर वाढले असून त्याचा भार शेतकऱ्यांवर पडत आहे. ९ :२४:२४ खताचा बॅगचा दर १९०० रुपये, महाधन १७०० रुपये, तर २४ : २४ : ० खताचा दर १७०० रुपये झाला आहे. अमोनियम खताची बॅग चारशे रुपये होती, आता हजार रुपये दर झाला आहे. खतांचे दर वाढल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com