
इंद्रजीत भालेराव
Indian Agriculture : मित्रहो महिनाभरापूर्वी मी अमीर खुसरो यांच्या फारशी कवितेच्या ओळी आणि बहिणाबाई चौधरी यांच्या सुगरणीचा खोपा या कवितेतील ओळी यातील विलक्षण साम्य दाखवून दिलेलं होतं. आज मी फारशी शायर जौक आणि बहिणाबाई चौधरी यांच्या काही ओळींमधलं साम्य दाखवून देणार आहे.
जौक हे दिल्लीचा शेवटचा बादशहा बहादुर शहा जफर यांचे कवितेतले गुरु, म्हणजे उस्ताद. कवींच्या कालखंडात पाहायचं झालं तर जौक हे गालिब यांचे समकालीन. दिल्लीतील प्रतिष्ठित कवी. त्यांच्या कवितेतील काही ओळी अशा आहेत,
लाई हयात आये
कजा ले चली चले
अपनी खुशी ना आये
ना अपनी खुशी चले
आता आपण बहिणाबाईंची जीव नावाची कविता पाहूयात. या कवितेविषयी मी इतरत्र पुष्कळ लिहिलेलं आहे. जीव ही एक अनाकलनीय गोष्ट आहे. जीव, मन, देव आणि संसार अशा चार अनाकलनीय विषयांवर बहिणाबाईंच्या अतिशय सुलभ आणि आकलनीय अशा कविता पाहायला मिळतात.
हे अनाकलनीय विषय बहिणाबाईंनी अत्यंत सोप्या भाषेत आकलनाच्या कक्षेत आणून ठेवलेले आहेत. जौक यांच्या वरील चार ओळींना समांतर बहिणाबाईंच्या जीव कवितेतल्या खालील काही ओळी आपल्याला पाहता येतील,
जीव देवानं धाडला
जन्म म्हणे आला आला
जव्हा आलं बोलावनं
मौत म्हणे गेला गेला
आला सास गेला सास
जीवा तुझं रे तंतर
अरे जगनं मरणं
एका सासाचं अंतर
जगजग माझ्या जीवा
असं जगणं मोलाचं
उच्च गगनासारख
धरतरीच्या तोलाचं
दोन भाषेतले, पृथ्वीच्या दोन टोकाला राहणारे कवी जेव्हा आपले अस्सल अनुभव लिहितात तेव्हा त्यांच्या स्थळ, काळ आणि वेळात कुठलंच साम्य नसतानाही त्यांच्या कवितेत मात्र विलक्षण साम्य असू शकतं. अशी अनेक उदाहरणं आपणाला दाखवून देता येतात.
बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेला समांतर अशी अनेक उदाहरणं याआधीही मी दाखवलेली आहेत. तसंच हे एक उदाहरण. फारशी शायर जौक यांच्यापेक्षा बहिणाबाईंच्या ओळी काकणभर उजव्याच आहेत हे आपल्या सहज लक्षात येतं. अमीर खुसरोच्या आणि बहिणाबाईंच्या तुलनेतही असंच म्हणता येईल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.