Vegetable Market : अकोल्यातील जनता भाजी बाजारात दुर्गंधी

Akola Janta Vegetable Market : प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अक्षरशः चिखलातून मार्ग काढत नागरिकांना बाजारात ये-जा करावी लागते. तर अशाच दुर्गंधी युक्त वातावरणात भाजीपाला खरेदी-विक्रीचे व्यवहार होत असतात.
Vegetable Market
Vegetable MarketAgrowon
Published on
Updated on

Akola News : महानगरात मध्यवर्ती ठिकाणी असलेला विदर्भातील अकोल्याचा प्रमुख जनता भाजी बाजार गेल्या काही दिवसांपासून दुर्गंधीने माखला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अक्षरशः चिखलातून मार्ग काढत नागरिकांना बाजारात ये-जा करावी लागते. तर अशाच दुर्गंधी युक्त वातावरणात भाजीपाला खरेदी-विक्रीचे व्यवहार होत असतात.

Vegetable Market
Kolhapur Vegetables Market : पालेभाजी उत्पादक शेतकऱ्यांचे बजेट कोलमडलं, टोमॅटोची लाली कायम

अकोला बाजार पेठेत पुणे, नाशिक, मराठवाडा तसेच विदर्भाच्या विविध जिल्ह्यातून दररोज मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रीला येत असतो. स्थानिक टॉवर चौक परिसरात असलेल्या बाजारात दररोज कोट्यवधींचे व्यवहार होतात. मात्र, या जनता भाजी बाजारातील स्वच्छतेकडे सर्वांचे दुर्लक्ष असल्याने नागरिक, व्यापारी वैतागले आहेत. दररोज त्यांच्या आरोग्याचा खेळ सुरू आहे.

Vegetable Market
Vegetables Rate : महापुराचा भाजीपाला मार्केटवर परिणाम, आवक मंदावल्याने बाजारभावात अस्थिरता

अकोल्यातील जनता भाजी बाजार ही विदर्भातील एक प्रमुख बाजारपेठ ओळखली जाते. या बाजापेठेतील दृश्ये पाहून येथे भाजीपाला खरेदी करावा की नाही, असा विचार ग्राहक करतो. शिवाय भाजीपाला विक्रीसाठी तेथे बसावे की नाही, असे व्यापारीही विचार करतात. या बाजारात चिखल झाला असून अस्वच्छतेने कळस गाठला आहे. या भाजी बाजाराला लागून बसस्थानक तसेच शासकीय विश्रामगृह आहे. महानगरपालिकेने बाजारात स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज व्यक्त होत आहे.

रात्रंदिवस वर्दळ

या भाजीबाजारात विविध भागातून येणाऱ्या भाजीपाल्याची रात्री हर्राशी होत असते. पहाटेपर्यंत हे व्यवहार चालतात. त्यानंतर दिवसभर बाजार भरतो. विक्रेते भाजीपाल्याची दुकाने लावून बसतात. सातत्याने वर्दळ राहणाऱ्या या बाजारातील रस्त्यांवर सर्वत्र खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचते. पाणी वाहून जाण्याची व्यवस्था नसल्याने यातूनच मार्ग काढावा लागतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com