sandeep Shirguppe
आपल्या दिवसाची सुरुवात चहाने सुरू होते. मात्र महिनाभर तुम्ही चहा पिला नाहीतर शरिरावर काय परिणाम होतील?
संशोधनानुसार, दुधाच्या चहाऐवजी काळ्या चहाचे अनेक आरोग्य फायदे होऊ शकतात.
चहामध्ये कॅफीन असल्यामुळे, त्याचे नियमित किंवा जास्त सेवन केल्याने अनेक दुष्परिणाम देखील होऊ शकतात.
आरोग्य तज्ञ म्हणतात, मर्यादित प्रमाणात चहा पिणे बहुतेक लोकांसाठी हानिकारक मानले जात नाही.
जर तुम्ही दिवसातून चार-पाच वेळा जास्त प्रमाणात प्यायला तर त्याचे काही दुष्परिणाम होऊ शकतात.
दूध आणि साखर नसलेला आणि ज्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे मसाले असेल तर त्याचे बरेच फायदे देखील होऊ शकतात.
३० दिवसांसाठी कॅफिनचे सेवन कमी केल्याने चांगली झोप, कमी चिंता आणि पाचक आरोग्यामध्ये सुधारणा होऊ शकते.
जास्त चहा प्यायल्याने गॅस, मळमळ किंवा पोटदुखी यांसारखी अस्वस्थ लक्षणे जाणवू शकतात.
महिनाभर चहा किंवा कॅफिन असलेल्या गोष्टींपासून दूर राहिल्यास पचनाच्या समस्या, बद्धकोष्ठता कमी होतो.