Healthy Cookies : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आयुर्वेदिक, शुगरफ्री कुकीज

महात्मा फुले कृषी विद्यापीठातील अन्न तंत्रज्ञान विभागाने फुले शुगर फ्री कुकीज ची निर्मिती केली आहे. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील यांच्या हस्ते या पदार्थाच अनावरण करण्यात आल.
Healthy Cookies
Healthy Cookies Agrowon

गेल्या काही वर्षांपासून भारतात कुकीज (Cookies) आणि बिस्किटांची (Biskits) मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषतः २०१५ नंतर उत्पादनात प्रचंड वाढ झाल्याचे दिसते. स्टॅटिस्टा रिसर्च डिपार्टमेंटच्या आकडेवारीनुसार २०२० मध्ये देशात ६ लाख ३२ हजार टन कुकीज आणि बिस्किटांचे उत्पादन झाले. मागणीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. परंतु आता आरोग्याबद्दलही जागरूकता वाढली आहे. त्यामुळे आरोग्यदायी कुकीज आणि बिस्किटांना ग्राहकांची पसंती मिळत आहे.

Healthy Cookies
Mahatma Phule : महात्मा फुले यांचे कृषी विचार

राहुरीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे देशातील आघाडीच्या कृषी विद्यापीठांपैकी एक म्हणून ओळखले जाते. प्रामुख्याने पिकांच्या नवीन जाती आणि शेती पध्दतीतींतल संशोधनासाठी विद्यापीठाची ख्याती आहे. परंतु या विद्यापीठाने आता पोषक आहारावरील संशोधनावरही भर दिला आहे.

त्याचाच एक भाग म्हणून विद्यापीठाने आरोग्यदायी `फुले शुगर फ्री कुकीज` तयार केल्या आहेत. विद्यापीठातील अन्न तंत्रज्ञान विभागाने हे उत्पादन विकसित केले आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील यांच्या हस्ते या पदार्थांचं अनावरण करण्यात आलं.

Healthy Cookies
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ऊस वाणांचा राज्यात दबदबा

विद्यापीठाने यापूर्वी विकसित केलेल्या फुले नानकटाई बिस्किटांना पेटंट मिळालेलं आहे. अन्न तंत्रज्ञान विभागामार्फत भाजीपाला प्रक्रिया आणि बेकरी व्यवसायाचे एक महिना कालवधीचे प्रशिक्षण वर्ग राबविले जातात. आतापर्यंत ३० प्रशिक्षणांर्थींनी फळे, भाजीपाला प्रक्रिया उद्योग तर १५ प्रशिक्षणार्थींनी बेकरी व्यवसाय सुरु केला आहे. 

अन्न तंत्रज्ञान विभागामार्फत आयुर्वेदीक कुकीजही तयार केल्या आहेत.  यामध्ये फुले शतावरी कुकीज, फुले अश्वगंधा कुकीज, फुले पुदिना कुकीज, फुले बेहडा कुकीज आणि फुले आवळा कुकीज यांचा समावेश आहे. याशिवाय विद्यापीठाच्या बेकरी युनिटमध्ये संशोधनात्मक व प्रायोगिक तत्वावर फुले ज्योती मिल्क ब्रेड, फुले स्वीट बन्स, फुले मिल्क टोस्ट, फुले सुरती जिरा बटर, फुले नाचणी बिस्कीट आणि फुले नानकटाई तयार केल्या जातात. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com