Dengue Prevention: डेंगी प्रतिरोध दिनानिमित्त जनजागृती 

Health Awareness: डेंगी प्रतिरोध दिनानिमित्त निफाड तालुक्यात आरोग्य विभाग आणि पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती मोहिमा राबवल्या जात आहेत. नागरिकांनी परिसर स्वच्छ ठेवून डेंगी प्रतिबंधासाठी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन आरोग्य अधिकाऱ्यांनी केले.
Dengue Prevention
Dengue PreventionAgrowon
Published on
Updated on

Nashik News: दर वर्षी जुलै महिन्यात ‘डेंगी प्रतिरोध दिन’ साजरा करण्यात येतो. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, यंदा निफाड तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय निफाड व तालुका आरोग्य विभाग, पंचायत समिती निफाड यांच्या संयुक्त विद्यमाने डेंग्यू आजाराबाबत जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहे.

उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजीव तांभाळे यांनी सांगितले की, डेंगी हा डासांद्वारे पसरणारा विषाणूजन्य आजार असून पावसाळ्यात त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती करून प्रतिबंधात्मक उपायांची अंमलबजावणी करण्यासाठी डेंगी प्रतिरोध दिन साजरा केला जातो.

Dengue Prevention
Raigad Dengue Cases : रायगड जिल्ह्यात हिवताप निर्मूलनावर भर

या अनुषंगाने, गाव पातळीवर आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून साथरोग नियंत्रणासाठी कीटकशास्त्रीय सर्वेक्षण राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुजित कोशिरे यांनी सांगितले की, डेंगीचा फैलाव रोखण्यासाठी घरासमोर व परिसरात पाणी साचू देणे टाळावे.

Dengue Prevention
Risk Of Dengue : डेंग्यूचा वाढता धोका कमी करण्यासाठी उपाय

पाण्याच्या टाक्या, ड्रम, कुलर यांची झाकणं बंद ठेवावीत. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. तसेच सकाळी व संध्याकाळी पूर्ण बाह्य कपडे वापरावेत. डासांपासून संरक्षणासाठी मच्छरदाणी, रिपेलंट्सचा वापर करावा.

या पार्श्वभूमीवर, उपजिल्हा रुग्णालय व आरोग्य विभागाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, डेंगीवर नियंत्रण मिळवायचे असल्यास परिसराची स्वच्छता राखणे ही सामूहिक जबाबदारी आहे. शासन, संस्था आणि नागरिकांनी एकत्रित प्रयत्न केल्यास डेंगीवर निश्चितच नियंत्रण मिळवता येईल. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com