Grampanchyat Award In Dhule : बोराडी, म्हसदी, गोंदूर ग्रामपंचायतींना पुरस्कार

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाअंतर्गत धुळे जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम, तर अन्य तीन ग्रामपंचायतींना विशेष पुरस्कार जाहीर झाले.
Grampanchyat News
Grampanchyat NewsAgrowon
Published on: 
Updated on: 

Dhule News : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाअंतर्गत धुळे जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम, तर अन्य तीन ग्रामपंचायतींना विशेष पुरस्कार जाहीर झाले.

यात म्हसदी येथील ग्रामपंचायतीस जिल्हास्तरीय तीन लाख पारितोषिक असलेला द्वितीय क्रमांकाचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम पुरस्कार जाहीर झाला आहे.

तपासणीनंतर पुरस्कार

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील ५६ जिल्हा परिषद गटातील सर्व ५४१ समाविष्ट ग्रामपंचायतींमध्ये स्पर्धा घेण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी संबंधित तालुक्यातील पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद गट तपासणी समिती स्थापन केली होती.

Grampanchyat News
Grampanchyat Election In Nandurbar : नंदुरबार जिल्ह्यात ८४ ग्रामपंचायतींच्या १११ जागांसाठी होणार मतदान

तपासणी अहवालानुसार जिल्ह्यातील सहा ग्रामपंचायतींना पुरस्कार जाहीर झाले आहेत. ग्रामपंचायतींना राज्य पाणी व स्वच्छता मिशन यांच्याकडील दहा लाख ७५ हजार रुपये निधीतून पुरस्काराची रक्कम वितरित करण्यात येणार आहे.

म्हसदीत समाधान

म्हसदी येथील ग्रामपंचायतीस पुरस्कार जाहीर झाल्याने ग्रामस्थांसह सरपंच शैलजा देवरे, उपसरपंच चंद्रकांत देवरे, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व ग्रामविकास अधिकारी मेघश्याम बोरसे यांनी समाधान व्यक्त केले.

भविष्यातही संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प ग्रामपंचायत प्रशासनाने केला आहे. हा पुरस्कार ग्रामस्थांचा सहभाग आणि ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतल्याने प्राप्त झाला आहे.

पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायती (कंसात रक्कम)

बोराडी (ता. शिरपूर) येथील ग्रामपंचायतीस प्रथम क्रमांकाचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम (पाच लाख), म्हसदी (ता. साक्री) येथील ग्रामपंचायतीस द्वितीय क्रमांकाचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम (तीन लाख),

गोंदूर (ता. धुळे) ग्रामपंचायतीस तृतीय क्रमांकाचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम (दोन लाख) पुरस्कार जाहीर झाला. शिवाय लोहगाव (ता. शिंदखेडा) येथील ग्रामपंचायतीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार- पाणी गुणवत्ता (पंचवीस हजार),

तऱ्हाडी (ता. शिरपूर) येथील ग्रामपंचायतीस वसंतराव नाईक पुरस्कार- सांडपाणी (पंचवीस हजार), तर बोराडी (ता. शिरपूर) येथील ग्रामपंचायतीस आबासाहेब खेडकर पुरस्कार- शौचालय व्यवस्थापन (पंचवीस हजार) जाहीर झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.