Warana Milk : दूध उत्पादक, कर्मचाऱ्यांना ‘वारणा’ देणार ५४ कोटी ६३ लाख

टीम ॲग्रोवन

वारणा सहकारी दूध संघामार्फत  दिवाळीसाठी उत्पादकांना दूध फरक बिल, दूधबिल, कामगारांना पगार व बोनसचे तब्बल कोटी ५४ कोटी ६३ लाख रुपये देणार असल्याची माहिती

Milk Production | Agrowon

वारणा दूध संघाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे व कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी दिली.

Milk Production | Agrowon

दूध संघाच्या इतिहासात प्रथमच दीपावलीनिमित्ताने दूध उत्पादकांना म्हैस दुधासाठी प्रतिलिटर २ रुपये ३० पैसे, तर गाय दुधासाठी १ रुपये १० पैसे इतके उच्चांकी फरकबिल देण्याचा निर्णय संघाच्या संचालक मंडळाने घेतला आहे.

Milk Productuion | Agrowon

उत्पादकांच्या खात्यावर फरकबिल, दूधबिल, कामगारांचा बोनस जमा करण्यात येत आहे.

Milk | Agrowon

बाजारात वारणाच्या दूध व दुग्ध पदार्थांना मागणी वाढली असून, राज्य तसेच राज्याबाहेरील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे व विक्रीत वाढ झाल्याचे अध्यक्ष डॉ. कोरे यांनी सांगितले.

Dr. Kore | Agrowon

तसेच दिवाळीसाठी संघ कर्मचाऱ्यांना ११ टक्के इतका बोनस देण्याचा निर्णय घेतला असून, कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

Warna Milk | Agrowon

दूध संघाशी संलग्न तात्यासाहेब कोरे दूध-साखर वाहतूक संस्था, सावित्री महिला औद्योगिक संस्था, अमृत सेवक पतसंस्था व

Warna Milk | Agrowon

डॉ. आर. ए. पाटील पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांना एकाचवेळी बोनस देण्यात येणार आहे, असे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी सांगितले.

Warna Milk | AGrowon
cta image | Agrowon
येथे क्लिक करा