Crop Damage : नैसर्गिक आपत्तीच्या कामांत टाळाटाळ ; जालन्यातील १४ कृषी सहायकांविरुद्ध गुन्हा

Natural calamities : नैसर्गिक आपत्ती सारख्या संवेदनशील कामांमध्ये टाळाटाळ केल्याप्रकरणी जालना तालुक्यातील १५ गावांच्या १४ कृषी सहायकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon

Jalna News : जालना तालुक्यातील १५ गावांच्या १४ कृषी सहायकांविरुद्ध जालना पोलिसात शुक्रवारी (ता. २५) गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. नैसर्गिक आपत्ती सारख्या संवेदनशील कामांमध्ये टाळाटाळ केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५’ मधील कलम ५६ व ५७ मधील तसेच ‘भांदवि’ कलम १८८ मधील तरतुदींप्रमाणे दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भातील तक्रारीसाठी जालना तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार दिलीप सोनवणे यांना जालना येथील तहसीलदारांनी प्राधिकृत केले होते.

Crop Damage
E Peek Pahani : पिक विमा मिळवायची असल्यास आपली ई-पीक पाहणी करून घ्या ; जळगाव जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

फिर्यादीनुसार, २०२२ च्या पावसाळी हंगामात सततच्या पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्तांना विशेष बाब म्हणून वाढीव दराने अनुदान वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. २० जून २०२३ च्या निर्णयान्वये यासंदर्भात शासनाकडून सूचना प्राप्त झाल्या. त्या अनुषंगाने शासनाच्या पोर्टलवर बाधित शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यासाठी विहित नमुन्यात माहिती गोळा करून बाधित शेतकऱ्यांच्या याद्या सादर करण्यासाठी कळविण्यात आले. यातील अनुदान २०२३- २४ समाप्त होण्यापूर्वी संबंधित खातेदारांच्या खात्यावर वर्ग होण्यासाठी हे काम वेळेत पूर्ण करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट निर्देश दिले होते. २६ जुलै २०२३ रोजी याद्या दाखल न केल्याने नोटीसही बजावण्यात आल्या. ३१ जुलै २०२३ रोजी यासंदर्भात कृषी सहाय्यकांनी खुलासा सादर केला होता. जो असमाधानकारक असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

Crop Damage
Crop Insurance : विमा संरक्षण कालावधी संपल्यावर पीक पडताळणी ; कृषी विभागाचा उफराटा कारभार

कृषी सहाय्यकांना यादी तयार करण्यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी आवश्यक ते संगणक साहित्य पुरविण्याबाबत कळविण्यात आले. तसेच तलाठ्यांकडील लॅपटॉप पुरविण्यात येतील. तसेच आवश्यकता भासल्यास तहसील कार्यालयातील संगणकांचा याद्या तयार करण्यासाठी वापर करावा, असे सूचित केले होते.

पीक नुकसानीच्या याद्या देण्यास टाळाटाळ

दरम्यान, कृषी सहाय्यकांनी याद्या दाखल न केल्याने ९ ऑगस्ट २०२३ रोजी नोटीस बजावली. आपल्यावर कारवाई का करू नये, याबाबत लेखी खुलासा २४ तासांच्या आत मागविण्यात आला. तरीही २५ ऑगस्टपर्यंत जालना तालुक्यातील १५ गावांच्या १४ कृषी सहायकांनी पीक नुकसानीसाठी देय अनुदान याद्या सादर केल्या नाहीत. त्यामुळे त्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड करता आल्या नाहीत. त्यात जाणीवपूर्वक टाळाटाळ केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com