
Soil Management : जमिनीची सुपिकता तपासण्यासाठी माती परिक्षण केलं जात. पण बऱ्याच वेळा मातीपरिक्षणासाठी शेतातील चुकीच्या जागेवरचा मातीचा नमुना घेतला जातो. त्यामुळे माती परिक्षणाचा अहवाल चुकीचा येऊ शकतो. हे टाळण्यासाठी मातीचा नमुना घेताना शेतातील विशिष्ट जागा टाळल्या पाहिजेत.
शेताच्या कडेचा- धुऱ्याकडील किंवा बांधाकडील भाग, विहिरीजवळची जागा तसच बांधावरील मोठ्या झाडांची सतत सावली पडणारा भाग, शेताच्या चारही कोपऱ्यावरील भाग इ. ठिकाणी आपण सहसा पीक घेत नाही. त्यामुळ या जागेमधून पिकाला पोषक अन्नद्रव्य पुरविली जात नाहीत. म्हणून अशा ठिकाणचा मातीचा नमुना ‘प्रातिनिधिक नमुना’ नसतो.
शेतामध्ये पाण्याचा पाट वाहत असणाऱ्या ठिकाणाच्या मातीचा नमुना परीक्षणासाठी घेऊ नये. ही माती सतत ओली राहत असल्यामुळे अशा मातीमधील पोषक अन्नद्रव्ये आणि इतर गुणधर्म शेतामधील इतर ठिकाणच्या मातीपेक्षा वेगळे असतात. तेथील मातीचा परीक्षण अहवाल चुकीचा येऊ शकतो.
शेतात सेंद्रिय खताचा पुरवठा करण्यासाठी जनावर, शेळ्या-मेंढ्या बसवल्या जातात. अशा ठिकाणी जनावरांच मलमूत्र मातीच्या वरच्या थरात मिसळली जातात. अशा मातीमध्ये त्या शेतातील अन्य जागांच्या सर्वसाधारण मातीपेक्षा पोषक अन्नद्रव्य आणि इतर घटकांच प्रमाण जास्त असत. शक्यतो शेतात जनावर बसविण्यापूर्वीच योग्य पद्धतीन मातीचा नमुना घ्यावा.
शेतातील पिकांच्या अवशेषांचा काडी-कचरा वेचून त्याचे ढीग करून तो शेतातच जाळून टाकण्याची पद्धत आहे. हे चुकीच असून, काडी-कचरा जाळलेल्या जागेवरील माती व त्यातील पोषक अन्नद्रव्यांच्या निर्मितीसाठी कार्यरत सूक्ष्मजीव नष्ट झालेले असतात. उष्णतेमुळ त्या जागेवरील पोषक अन्नद्रव्यांच रासायनिक स्वरूप आणि प्रमाणसुद्धा बदलून जात. त्यांची उपलब्धता बिघडते. म्हणून जळालेल्या जागेवरील मातीचा नमुना घेऊ नये.
शेतात पेरणीपूर्वी शेणखत, कंपोस्ट खत किंवा सेंद्रिय खत टाकल जात. त्याचे शेतात अनेक ठिकाणी ढीग केले जातात. अशा ठिकाणचा नमुना घेऊ नये.
रासायनिक खत दिल्यावर दोन ते तीन महिन्यांनंतर अशा जागेवरील मातीचा नमुना घ्यावा. कारण खते दिल्यानंतर त्याचे कमी अधिक अंश शेतामध्ये दोन ते तीन महिन्यापर्यंत राहू शकतात.
पाऊस पडल्यावर किंवा ओलीत केल्यावर मातीमधील काही पोषक अन्नद्रव्यांच विनियमन बदलून जात आणि त्यांची उपलब्धता बदलते. अशा वेळी ओल्या जमिनीतून शक्यतो मातीचा नमुना घेऊ नये.अपरिहार्य स्थितीमध्ये अशा जागेवरील मातीचा नमुना घेतल्यास तो प्रथम सावलीत वाळवावा. नंतर प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावा.
शेतात खोल नांगरणी केल्यामुळ मातीच्या थरांची उलथापालथ झालेली असते. अशा जागेवर आपण मातीचा नमुना घेण्यासाठी व्यवस्थितपणे खड्डा खणू शकत नाही आणि नेमकी मूळ-परिवेशातील माती घेऊ शकत नाही. त्यामुळ नांगरणी करण्यापूर्वीच माती परीक्षणासाठी मातीचा नमुना घ्यावा. अशा प्रकारे आपला माती परीक्षण अहवाल योग्य येण्यासाठी वरीलप्रमाणे खबरदारी घेण अत्यंत महत्त्वाच आहे.
कोणत्याही हंगामी किंवा फळ पिकांच्या लागवडीच नियोजन करण्यापूर्वी पूर्वीचे पीक काढून झाल्यानंतर मातीचा प्रातिनिधिक नमुना काढून घ्यावा. तो अधिकृत परिक्षण प्रयोगशाळेत पाठवावा.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.