PM Kisan Scheme : पीएम किसानच्या १९ व्या हप्त्यापूर्वी पाच चुका करू नका; अन्यथा लाभ मिळणार नाही!

Pm Kisan KYC : ई केवायसी करणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ई केवायसी करून घ्यावी. अन्यथा १९ व्या हप्त्यापासून शेतकऱ्यांना वंचित राहावं लागेल. तसेच आधार नंबर बँक खात्याला लिंक नसेल तर शेतकरी वंचित राहू शकतात.
PM Kisan Scheme
PM Kisan SchemeAgrowon
Published on
Updated on

PM Kisan Scheme 19 Installment : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १९ वा हप्ता २४ फेब्रुवारी २०२५ रोजी वितरित करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ई केवायसी पूर्ण करून घ्यावी. केंद्र सरकार या योजनेतून शेतकऱ्यांना प्रतिवर्षी ६ हजार रुपये तीन हप्त्या देतं. त्यासाठी कुटुंब हे या योजनेचं घटक आहे. परंतु पीएम किसानचा निधी अल्पभूधारक शेतकऱ्यांना देण्यात येतो. तसेच योजनेच्या अटी आणि निकषानुसार काही शेतकरी या योजनेसाठी अपात्र आहेत. या योजनेला अपात्र शेतकरी कोण आहेत? याबद्दलची माहिती जाणून घेऊया.

- नोकरदार

तुम्ही डॉक्टर, इंजिनियर, वकील, सनदी लेखपाल, वास्तुतज्ञ आणि कोणत्याही व्यावसायिक प्रकारचं काम करणारी व्यक्ती या योजनेसाठी अपात्र आहेत.

- करदाते

शेतकऱ्याने मागील वर्षी जर कर भरला असेल तर अशा शेतकऱ्याला या योजनेतून लाभ मिळत नाही. तसेच जे शेतकरी व्यवसाय आणि नोकरी करतात व करदाते आहेत, अशी शेतकरी योजनेस अपात्र आहेत.

- निवृत्ती वेतनधारक

शासकीय निवृत्ती वेतनधारक कर्मचाऱ्यांना दरमहा १० हजारांवरून अधिक निवृत्तीवेतन मिळत असेल तर अशा व्यक्ती योजनेला अपात्र आहेत.

- संस्थात्मक जमीन

शेतकऱ्याची शेत जमीन कोणत्याही संस्थेच्या नावावर असेल तर अशी शेतकरी या योजनेला अपात्र आहेत. केवळ स्वत:च्या नावावर जमीन असणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत.

- वरिष्ठ अधिकारी आणि राजकारणी

राष्ट्रपती, राज्यपाल. खासदार, आमदार, मंत्री, महापौर, जिल्हा पंचायत समिती अध्यक्ष आदि पदांवर असलेल्या व्यक्ति योजनेसाठी अपात्र आहेत.

पीएम किसान योजनेत लाभार्थी शेतकऱ्यांकडून पुढील चुकांमुळे अपात्र ठरण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या बाबींची काळजी घ्यावी.

ई केवायसी करणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ई केवायसी करून घ्यावी. अन्यथा १९ व्या हप्त्यापासून शेतकऱ्यांना वंचित राहावं लागेल. तसेच आधार नंबर बँक खात्याला लिंक नसेल तर शेतकरी वंचित राहू शकतात. त्यामुळे आधार नंबर बँक खात्याला लिंक करावा. अर्ज करताना शेतकऱ्यांकडून चुकीचं नाव, बँक खाते क्रमांक वा आधार नंबर दिला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांनी अर्ज करताना या गोष्टींची खातरजमा करून घ्यावी. तसेच जमिनीच्या कागदपत्रातील त्रुटीदेखील दूर कराव्यात.

PM Kisan Scheme
PM Kisan Scheme 19th Installment : पीएम किसानच्या १९ व्या हप्त्याची तारीख ठरली; केंद्रीय कृषिमंत्री चौहान यांनी दिली माहिती

शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी. तसेच पीएम किसानचं स्टेट्स तपासण्यासाठी योजनेच्या अधिकृत pmkisan.gov.in वेबसाईटवर जाऊन होमपेजवरील फार्मर कॉर्नरवर क्लिक करा. त्यानंतर स्टेटस समजून घ्या वर क्लिक करा. त्यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर आणि कॅपचा टाका. गेट ओटीपीवर क्लिक करून तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी टाका. त्यानंतर तुम्हाला पीएम किसानच्या हप्त्याचा मागील तपशील पाहता येईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com