Konkan Rain Update : रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी ९१ टक्के पाऊस

Rain News : जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यांत महावेध प्रणालीद्वारे होत असलेल्या नोंदणीनुसार जिल्ह्यात सरासरी ९१ टक्के पाऊस झाला आहे.
Konkan Rain
Konkan Rain Agrowon
Published on
Updated on

Ratnagirin News : जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यांत महावेध प्रणालीद्वारे होत असलेल्या नोंदणीनुसार जिल्ह्यात सरासरी ९१ टक्के पाऊस झाला आहे. दरवर्षी सरासरी ३३६४ मिलिमीटर पाऊस पडतो. गतवर्षी याच कालावधीत २४८१ मिमी पावसाची नोंद झाली होती. यंदा सुरुवातीचे दोन महिने भातशेतीला पूरक पाऊस होता. मात्र ऑगस्ट महिन्यात पडलेल्या अनियमित पावसामुळे भातशेतीवर कीडरोगांचा प्रादुर्भाव झाला.

जिल्ह्यात १ जूनपासून २८ ऑगस्टपर्यंत सरासरी ३१०५ मिमी पाऊस झाला. यंदा सर्वाधिक पाऊस खेड तालुक्यात ३३०१ मिमी तर सर्वांत कमी पाऊस रत्नागिरीत २९६६ मिमी पडला. तीन महिने पूर्ण होण्यापूर्वीच सरासरीच्या तुलनेत समाधानकारक पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील धरणे भरून वाहू लागली आहेत. कोकणात चार महिने पावसाचे आहेत. अजून एक महिना शिल्लक आहे. परिणामी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे.

Konkan Rain
Monsoon Rain : सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस

यंदा मॉन्सून वेळेत दाखल झाल्यामुळे भात पेरणीला सुरुवात झाली. परंतु जूनच्या दुसऱ्या आठवड्यात घेतलेल्या विश्रांतीमुळे भात पुनलर्गगवडीला आठ दिवसांचा विलंब झाला. तरीही जिल्ह्यात यंदा सुमारे ४० हजार हेक्टरवर भात पुनर्लागवड करण्यात आली आहे. पुढे पावसाचे वेळापत्रक सुरळीत राहिल्यामुळे बळीराजाही आनंदित होता.

Konkan Rain
Sindhudurg Rain : समुद्रात वादळस्थिती कायम; सिंधुदुर्गात जोरदार पाऊस

उत्पादन चांगले येण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चलबिचल सुरू झाली. पावसाअभावी जमिनीला भेगा पडल्या होत्या. कातळावरील शेती पूर्णतः सुकली होती. करपा, निळे भुंगेरे आदी प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव सुरू झाला. काही ठिकाणी भात उत्पादनावर परिणाम होणार आहे. मात्र हे प्रमाण तूलनेत कमी आहे. ऑगस्टच्या शेवटच्या टप्प्यात पाऊस पडल्यामुळे कीड-रोगांना वेळीच आळा बसला. अन्यथा मोठे नुकसान सहन करावे लागले असते.

तालुका सरासरी पाऊस

मंडणगड ३०६३

दापोली ३००६

खेड ३३०१

गुहागर २७४९

चिपळूण ३१५२

संगमेश्वर ३३३३

रत्नागिरी २९६६

लांजा ३११३

राजापूर २९७१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com