Shetkari Sangh Kolhapur : शेतकरी संघाच्या मुंबईतील जागेत गैरव्यवहाराचा प्रयत्न, माजी अध्यक्षांचा आरोप

Kolhapur Shetkari Sangh : कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो शेतकरी संघ मागच्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आला आहे.
Shetkari Sangh Kolhapur
Shetkari Sangh KolhapurAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी मिळून काढलेला शेतकरी संघ मागच्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आला आहे. दरम्यान संघाची निवडणूक लागणार असल्याने येथील वातावरण चांगलेच तापत असल्याचे दिसून येत आहे.

शेतकरी संघाचे कार्यक्षेत्र मोठे असल्याने संघाने मुंबईतही जागा घेतल्या होत्या परंतु मुंबईतील जागा भाड्याने देण्याच्या व्यवहारातून संघावर असलेले प्राधिकृत मंडळ गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न सुरू करत असल्याचा आरोप संघातील माजी अध्यक्ष आणि संचालकांच्यावतीने करण्यात आला आहे.

दरम्यान याबाबत जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांना निवेदन देण्यात आले आहे. याची गंभीर दखल घेऊन बुधवारी (ता. ११) या जागेबाबात मुंबईत होणारी बैठक रद्द करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.

हाय कोर्टाने ५ ऑक्टोबर रोजी संघाची निवडणूक तातडीने घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार संघाच्या मतदार यादीचा कार्यक्रम सुरू करावा, अशीही मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. संघाच्या संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर प्रशासक म्हणून नेमलेल्या अधिकाऱ्यांकडून चांगले काम झाले.

पण राजकीय दबाव वापरून प्राधिकृत मंडळाचे अध्यक्ष सुरेश देसाई, सदस्य अजितसिंह मोहिते, जयवंत पाटील यांनी सरकारी अधिकाऱ्यांना हटवून स्वतःचे प्राधिकृत मंडळ आणले. या मंडळाची मुदत संपण्यापूर्वीच त्यांनी डिसेंबर २०२३ पर्यंत ती वाढवून आणली.

या तिघांनी कारभार स्वीकारल्यापासून संघ हिताचे काम केलेले नाही. निव्वळ अर्थिक गैरव्यवहार करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.

Shetkari Sangh Kolhapur
Kolhapur Shetkari Sangh : जिल्हाधिकारी चले जाव; शेतकरी संघाच्या समर्थनात फलकबाजी, सभासद संतप्त

देसाई हे संचालक असताना त्यांनी होम केअर रिटेल मार्ट या कंपनीबरोबर चुकीचा करार केल्यामुळे संघास कोट्यवधी रुपयांचा तोटा झाला आहे, असा आरोप या निवेदनात केला आहे. प्राधिकृत मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम करताना टिंबर मार्केट येथील संघाची जागा अल्प दरात भाड्याने देऊन संघाचे नुकसान केले.

तसेच संघाची निवडणूक घेण्यासाठी टाळटाळ केली जात असल्याचा आरोप निवेदनात आहे. निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात माजी अध्यक्ष जी. डी. पाटील, अजितसिंह माने, माजी संचालक शशिकांत पाटील आदींचा समावेश होता.

यावर संघाचे अशासकीय मंडळाचे अध्यक्ष सुरेश देसाई म्हणाले की, शेतकरी संघाच्या विद्यमान मंडळाविरोधात आज ज्यांनी तक्रार केली आहे, त्यांच्याच काळात मॅग्नेट सोबत करार झाला आहे. यामध्ये आमचा काहीही संबंध नाही. मुंबईतील शेतकरी संघाचे प्लॉट भाड्याने देण्याबाबतचा निर्णय वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. हा निर्णय प्रशासकीय मंडळाने केला असे म्हणणे चुकीचे आहे. दरम्यान, सध्या आम्ही मुंबईत आहे, कोल्हापूरमध्ये आल्यानंतर याबद्दल विस्तृत खुलासा करू असे देसाई म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com