Carbon Credit Biogas : ‘कार्बन क्रेडिट बायोगॅस’अंतर्गत १७ कोटींवर अनुदान उपलब्ध

Gokul Doodh Sangh : योजनेअंतर्गत तीन हजार बायोगॅस प्रकल्प पूर्ण झाल्याबद्दल सहभागी सर्व घटकांचा पुण्यातील सिस्टीमा बायो संस्थेतर्फे सत्कार झाला.
Biogas
BiogasAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) एनडीडीबी (मृदा), सिस्टीमा बायो यांच्या संयुक्त विद्यमाने कार्बन क्रेडिट योजनेअंतर्गत जिल्ह्यातील दूध उत्पादक महिलांसाठी ‘गोकूळ’च्या माध्यमातून बायोगॅस योजना राबवली जात आहे.

योजनेअंतर्गत तीन हजार बायोगॅस प्रकल्प पूर्ण झाल्याबद्दल सहभागी सर्व घटकांचा पुण्यातील सिस्टीमा बायो संस्थेतर्फे सत्कार झाला. ‘गोकूळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.

Biogas
Biogas Plant : यंदा चार हजार सहाशे बायोगॅस संयंत्रे उभारणार

‘कार्बन क्रेडिट बायोगॅस योजनेअंतर्गत पाच हजार बायोगॅस मंजूर असून ४१ हजार २६० रुपये किमतीचा बायोगॅस दूध उत्पादकांना ५ हजार ९९० रुपये इतक्या किमतीस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे एकूण १७ कोटी ६३ लाख इतके अनुदान उपलब्ध झाल्याचे डोंगळे यांनी सांगितले.

Biogas
Biogas Subsidy : सांगलीत १९१ बायोगॅसचे अनुदान दीड वर्षापासून थकित

सिस्टीमा बायो कंपनीचे विभागीय व्यवस्थापक अनिकेत शिंदे म्हणाले, की सिस्टीमा बायो ही बायोगॅस निर्मितीमधील कंपनी असून जगभरातील वीसहून अधिक देशांमध्ये कार्यरत आहे. आजतागायात ५० हजारांहून अधिक लाभार्थ्यांनी बायोगॅस युनिटचा लाभ घेतला आहे.

या वेळी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक शशिकांत पाटील–चुयेकर, बाबासाहेब चौगले, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासाहेब खाडे, संचालिका अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, एनडीडीबीचे (मृदा) अधिकारी आशितोष कोकणे, महिला नेतृत्व विकास अधिकारी नीता कामत, संपदा थोरात, खुर्रम मुजावर, विपिन काळे आदी उपस्थित होते. एम. पी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com