Cotton Market : परभणी बाजार समितीत कापूस लिलाव ३० जूनपर्यंत सुरू राहणार

Cotton Rate : कॉटन मार्केट यार्डावर खाजगी व्यापाऱ्यामार्फत जाहीर लिलावाद्वारे होणारी कापूस खरेदी आता शुक्रवार (ता. ३०)पर्यंत पूर्ववत सुरू राहणार आहे.
Cotton Market
Cotton Market Agrowon
Published on
Updated on

Market Committee Parbhani News : परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील गावातील शेतकऱ्यांकडे अद्यापही मोठ्या प्रमाणात कापूस शिल्लक आहे. ही बाब विचारात घेऊन बाजार समितीच्या टीएमसी.

कॉटन मार्केट यार्डावर खाजगी व्यापाऱ्यामार्फत जाहीर लिलावाद्वारे होणारी कापूस खरेदी आता शुक्रवार (ता. ३०)पर्यंत पूर्ववत सुरू राहणार आहे. शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले यांनी केले आहे.

Cotton Market
Cotton Broker Association : ‘महाराष्ट्र कॉटन ब्रोकर्स’च्या अध्यक्षपदी सचिन शर्मा

मोसमी पावसाचे आगमन लक्षात घेऊन कॉटन मार्केट यार्डावर तसेच जिनिंगमध्ये कापूस साठवणुकीसाठी निवारे (शेड) सुविधा नसल्यामुळे बुधवार (ता.२१)पासून जाहीर लिलाद्वारे कापूस खरेदी बंद करण्याचा निर्णय बाजार समितीतर्फे जाहीर करण्यात आला होता.

परभणी बाजार समिती शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव तत्पर आहे. शेतकऱ्यांनी शेतीमालाची प्रतवारी करून आणल्यास बाजारभावाबाबत कोणतीही तक्रार उद्‍भवणार नाही.

दरवाढीच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांकडे अजून कापूस शिल्लक आहे. शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेऊन आपला कापूस स्वच्छ स्वरूपातील कापूस लवकरात लवकर विक्रीसाठी आणावा, असे आवाहन सभापती घुले, उपसभापती अजय चव्हाण, संजय तळणीकर, मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com