Sugar Rate : वाढत्या उन्हामुळे साखरेला मागणी, दरातही वाढ

Sugar Market : गेल्या पंधरवड्यापासून साखरेच्या दरात प्रति क्विंटल १०० रुपयांनी वाढ झाली आहे.
Sugar Rate
Sugar RateAgrowon

Kolhapur News : वाढत्या उन्‍हामुळे साखरेच्या मागणीत वाढ होत असल्याने देशांतर्गत बाजारात साखर दरावर याचा सकारात्मक परिणाम होत आहे. गेल्या पंधरवड्यापासून साखरेच्या दरात प्रति क्विंटल १०० रुपयांनी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात साखरेचे दर ३६०० ते ३६५० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.

एप्रिलच्या पूर्वाधात साखरेचे दर ३५५० रुपयांपर्यंत होते. एप्रिलच्या उत्तरार्धापासून साखरेच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली. सध्‍या कडक उन्हामुळे विशेष करुन शीतपेय उद्योगांकडून साखरेला सातत्याने मागणी वाढत आहे.

केंद्राने या महिन्यात साखरेचा कोटा २७ लाख टनांचा दिला आहे. यामुळे साखर बाजारात मुबलक उपलब्ध आहे. साखरेची टंचाई भासण्याची शक्यता नसल्याने आइस्क्रीम व शीतपेय उद्योगांकडून टप्प्या टप्प्याने खरेदी होत आहे.

Sugar Rate
Vithhal Sugar Mill : विठ्ठल कारखान्यावरील जप्तीची कारवाई अखेर मागे

सध्या देशभरातच उन्हाळा जादा आहे. महाराष्टात तर सातत्याने चाळीस अंश सेल्सिअसच्या वर आहे. शीतपेयांसह आइस्क्रीम, सरबत, ज्यूस आदींच्या मागणीतही एकदम वाढ झाली. अनेक कंपन्यांनी एप्रिलच्या सुरुवातीला खरेदी केलेल्या साखरेचा साठा संपला.

कंपन्यांनी एप्रिल उत्तरार्धापासून साखरेच्या खरेदीला प्राधान्‍य दिले. यामुळे कारखान्यांकडून साखर विक्रीच्‍या निविदा सातत्याने निघत आहेत. सध्या एमएसपीपेक्षा चारशे रुपयांनी साखरेच्या दरात वाढ आहे.

पावसाळा सुरू झाला की साखरेची मागणी कमी येईल या शक्यतेने अनेक कारखान्यांनी दिलेल्या कोट्याइतकी साखर विक्रीस काढण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहे. अर्थात, मागणीही असल्याने साखरेचे दर सध्या तरी समाधानकारक आहेत.

कोटा वाढविल्याने खरेदी कमी होईल यामुळे दर फारसे वाढणार नाहीत असा अंदाज साखर उद्योगाचा होता, पण वाढता उन्हाळा साखर उद्योगाच्या मदतीला धावून आल्‍याने कोटा वाढवूनही साखरेच्या दरात वाढ पाहावयास मिळत आहे.

Sugar Rate
Sugar Industry : साखर उद्योग सौरऊर्जा निर्मितीत येणार

फेब्रुवारीपासून एप्रिल अखेरपर्यंत साखरेच्या दरात क्विंटलला २०० रुपयांच्या पुढे वाढ आहे. सध्या उत्तर प्रदेश वगळता देशातील हंगाम संपला आहे. यामुळे मे महिन्यात मोठ्या प्रमाणात साखर निर्मिती होईल अशी स्‍थिती नाही. परिणामी, किमान पुढील पंधरा दिवस तरी साखरेचे भाव चांगले राहतील अशी चिन्हे आहेत.

दरात आणखी वाढ अपेक्षित

सध्या महाराष्ट्रात एम ग्रेड साखरेला ३६०० रुपयांपेक्षा जास्त दर मिळत आहे. तर एस ग्रेड साखरेला ३५५० रुपयापर्यंत दर आहे. उन्हाचा तडाखा कायम असल्याने येत्या पंधरा दिवसांत यांत आणखी वाढ अपेक्षित आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com