Plastic Flower Ban : कृत्रिम फुलांवर बंदी आणून फुलशेतीला संरक्षण द्या

Flower Farming : बाजारपेठेत सर्वत्र झेंडू, शेवंती, मोगरा यांच्या माळा उपलब्ध आहेत. ऐन सणासुदीला देखील फुलांना बाजारपेठ उपलब्ध होत नाही. त्यामुळे फुलशेतीमधील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती पूर्णपणे ढासळली आहे.
Plastic Flower
Plastic FlowerAgrowon
Published on
Updated on

Nashik News : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी फुलशेतीमध्ये शेतकऱ्यांनी वैविध्यता आणली आहे. मात्र कृत्रिम फुलांमुळे मागणीवर परिणाम होत आहे. त्यामुळे शासनाने याबाबत धोरण ठरवून कृत्रिम फुलांवर बंदी आणून फुलशेतीला संरक्षण द्यावे, अशी मागणी जिल्ह्यातील फूलउत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जिल्ह्यातील फूलउत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येत जिल्हाधिकाऱ्यांकडे कैफियत मांडली आहे पारंपरिक व सुधारित पद्धतीने फूल शेती करणारे हजारो शेतकरी आहेत. ज्यामध्ये गुलाब, शेवंती, झेंडू, निशिगंध, मोगरा, चाफा अशी पारंपरिक तसेच जरबेरा, जिप्सोफिला, कार्निशन, डच गुलाब या प्रकारची हरितगृहामधील देश-विदेशी फुलांचे उत्पादन घेत आहेत.

Plastic Flower
Artificial flowers: कृत्रिम फुलांच्या वापरावर बंदी घालावी

एकेकाळी नाशिक हा फूल शेतीमध्ये राज्यातील अग्रेसर जिल्हा म्हणून ओळखला जायचा. येथे हरितगृहातील शेतीचा विचार केल्यास जिल्हा मध्ये २०००-२०१५ पर्यंत १३०० ते १४०० हरितगृहात उत्पादन घेणारे शेतकरी होत. मात्र दरम्यानच्या काळामध्ये कृत्रिम फुलांचा भारतीय बाजारपेठेमध्ये शिरकाव झाल्यामुळे त्याचा थेट विपरीत परिणाम हरितगृहात फूल उत्पादक शेतकऱ्यांना बनण्यास सुरुवात झाली.

परिणामी गेल्या १० वर्षांमध्ये सध्या जिल्ह्यात अवघे ३५ ते ५० शेतकरी हे हरितगृहशेतीमध्ये शिल्लक आहेत. या कृत्रिम फुलांच्या अतिरिक्त वापराचा विपरीत परिणाम हा अलीकडील काळात प्रचंड मोठ्या प्रमाणावर पारंपरिक फूल शेतीवर देखील होऊ लागला आहे.

बाजारपेठेत सर्वत्र झेंडू, शेवंती, मोगरा यांच्या माळा उपलब्ध आहेत. ऐन सणासुदीला देखील फुलांना बाजारपेठ उपलब्ध होत नाही. त्यामुळे फुलशेतीमधील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती पूर्णपणे ढासळली आहे. फुलशेतीच क्षेत्र झपाट्याने कमी झाले आहे. ही फुलशेती फक्त शेतकरीच नव्हे तर मजूर, वाहतूकदार, फूल व्यावसायिक, फूल अडते, फूल सजावट कारागीर यांना प्रचंड मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करते व त्यांचे अर्थकारण संपूर्ण याच फूल शेतीवर अवलंबून आहे.

Plastic Flower
Plastic Flower Ban : प्लॅस्टिक फूल विक्रीवर शासनाने बंदी घालावी

फूल शेतीमुळे फक्त फूल शेतीच नव्हे, तर या फुलांवर बसणाऱ्या मधमाशांमुळे सर्वच प्रकारची शेती चांगल्या प्रकारे पिकवली जाते. फूल शेती पूर्ण बंद झाल्यास मधमाश्यांचा देखील गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच या कृत्रिम फुलांमध्ये वापरण्यात येणारे रंग मानवी आरोग्यास अत्यंत घातक असल्याचे संशोधनामध्ये आढळले असल्याचे नमूद केले आहे.

कृत्रिम फुलांचा मुद्दा पावसाळी अधिवेशनात

कोरेगाव मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये कृत्रिम फुलाचा मुद्दा उपस्थित केला आहे.त्यामुळे फूल उत्पादकांच्या अडचणी विचारात घेऊन फुलशेतीचे रक्षण करण्यासाठी शासनापर्यंत शेतकऱ्यांची मागणी प्रभावीपणे मांडून पाठपुरावा करावा, अशी मागणी जिल्ह्यातील फूलउत्पादक शेतकरी गणेश तिडके, गणेश वाघ, बाळू काठे, सचिन काठे, संजय वाघ, भास्कर काठे, दत्तू तिडके आदींनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com