Environmental Problems : कृत्रिम फुले पर्यावरण, शेतकऱ्यांसाठी हानिकारक

Artificial Flowers : प्लॅस्टिकच्या बेसुमार वापरामुळे पर्यावरणीय समस्या उभ्या राहात आहेत. त्यातच प्लॅस्टिकच्या फुलांची भर पडली असून, प्लॅस्टिक फुलांचा वापर हा पर्यावरणासह शेती आणि शेतकऱ्यांना घातक ठरत आहे.
Plastic Flowers
Plastic FlowersAgrowon
Published on
Updated on

Pune News : प्लॅस्टिकच्या बेसुमार वापरामुळे पर्यावरणीय समस्या उभ्या राहात आहेत. त्यातच प्लॅस्टिकच्या फुलांची भर पडली असून, प्लॅस्टिक फुलांचा वापर हा पर्यावरणासह शेती आणि शेतकऱ्यांना घातक ठरत आहे. त्यामुळे नागरिकांनी कृत्रिम प्लॅस्टिक फुलांचा वापर टाळावा, असे आवाहन पुष्पसंशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद यांनी केले.

राष्ट्रीय स्वच्छता अभियानाअंतर्गत प्लॅस्टिकच्या फुलांचा वापर आणि धोके या बाबत शेतकरी आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पुष्पसंशोधन संचालनालनालय, केए बायोप्लांट, राइज अँड शाइन, फ्लॉवर ग्रोवर्स कौन्सिल इंडिया, सोएक्स फ्लोरा आणि सहकारी शेतकरी फूल नर्सरी गट यांच्या वतीने फ्रेश फ्लॉवर्स आणि शोभिवंत झाडे यांचा वापर वाढण्यासाठीच्या कार्यशाळेत डॉ. प्रसाद बोलत होते.

Plastic Flowers
Plastic Waste Management : नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यात प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन युनिट

या वेळी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रांचे संचालक डॉ. कौशिक बॅनर्जी, सीबीआयचे पोलिस उपमहासंचालक डॉ. सुधीर हिरेमठ, सोएक्स फ्लोराचे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र पाटील, राइज अँड शाइनचे श्रावण कांबळे, के. एफ. बायोप्लांट्स किशोर राजहंस, ग्रोअर्स फ्लॉवर कौन्सिल ऑफ इंडिया धनंजय कदम आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

Plastic Flowers
Agriculture Plastic Technology : प्लॅस्टिक तंत्रज्ञानातून करा फळबागांचे संरक्षण

या वेळी डॉ. प्रसाद म्हणाले, ‘‘नैसर्गिक पाने आणि फुले यांचे मानवी जीवनात अतिशय महत्त्व आहे. मनातील भावना प्रकट करताना कृत्रिम फुले तो भाव पोचवू शकत नाही म्हणूनच लग्न तसेच इतर सण समारंभाला देखील सुंगधी आणि ताज्या फुलांचाच वापर केला जातो. आपल्या संस्कृतीमध्ये देखील देवांना आपण कृत्रिम फुलांचा वापर करत नाही. त्यामुळे नागरिकांनी प्लॅस्टिक फुलांचा वापर टाळावा.’’

राष्ट्रीय स्वच्छता दिवस तसेच गांधी जयंती निमित्ताने विविध घटकांना फुले आणि शोभिवंत झाडे यांचे वाटप करण्यात आले. तर कृत्रिम फुलांचा वापर टाळण्याची शपथ दिली. तसेच संस्थेतील विद्यार्थ्याने सामाजिक स्वच्छतेवर नाटक देखील सादर केले. तसेच या वेळी स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान देखील प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच सूत्रसंचालन प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. तारक नाथ सहा यांनी केले. तर कार्यक्रमाचे आयोजन वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रभा के. आणि डॉ. गणेश कदम यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com