Oil Seed Arrival : विदर्भात तिळासह नव्या भुईमुगाची आवक

Sesame Market : तिळाला क्विंटलला ११५० ते १२५०० रुपये दर
Oil Seed Arrival
Oil Seed ArrivalAgrowon

विनोद इंगोले ः ॲग्रोवन वृत्तसेवा
Groundnut Market : अमरावती ः विदर्भातील यवतमाळ, अमरावती, बुलडाणा, अकोला या भागांत उन्हाळी भुईमुगासह तिळाची लागवड होते. सध्या या पिकाचा हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने बाजारात या दोन्ही शेतीमालाची आवक वाढत असल्याचे चित्र आहे. अमरावती बाजारात भुईमूग शेंगाची दर दिवशी सरासरी १२० क्‍विंटल इतकी आवक होत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.

यवतमाळ जिल्ह्यात उन्हाळी भुईमुगाचा पॅटर्न होता. परंतु गेल्या काही वर्षांत या पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढीस लागला. परिणामी, शेंगधारणा न होणे त्यासोबतच इतरही अनेक प्रादुर्भाव या पिकावर दिसून येत होते. त्यामुळेच या पिकाचा पिच्छा सोडत शेतकऱ्यांनी तीळ लागवडीवर भर दिला. दारव्हा तालुक्‍यातील काजीपूर हे तीळ लागवडीमुळे नावारूपास आले आहे. तसेच महागाव तालुक्‍यातील उटी, पांढरकवडा या भागातही तीळ लागवड होते. तिळाला सध्या ११५०० ते १२५०० रुपयांचा दर मिळत आहे.

Oil Seed Arrival
Tur Arrival : अकोल्यात नव्या तुरीची आजपासून आवक स्वीकारणार

कारंजा लाड (जि. वाशीम) बाजार समितीत तिळाची आवक होत आहे. अमरावती बाजार समितीच्या तुलनेत या ठिकाणी अधिक आवक नोंदविण्यात आली. सुमारे १५० क्‍विंटल तिळाची आवक होत आहे. याला ११७५५ ते १२४०० रुपयांचा दर मिळाला. यवतमाळ बाजार समितीत देखील तिळाची आवक होत असून, या ठिकाणी १०८५० ते १२७०० रुपयांनी तिळाचे व्यवहार होत आहेत. यवतमाळ बाजारात दोन दिवसांपूर्वी दर ११७०० ते १२८०० रुपयांवर होते. त्यात प्रतिक्‍विंटल १०० रुपयांची घट नोंदविण्यात आली आहे. याच बाजारात भुईमुगाला ५३०० ते ६१०० रुपयांचा दर मिळत आहे.
कळमना बाजारात ११ मेपासून भुईमूग शेंगांची आवक होत आहे. सध्या ही आवक अवघी १० ते ३० क्‍विंटल अशी अत्यल्प आहे. आवकेत चढ-उतार होत असताना या बाजारात दर मात्र स्थिर होते. ४००० ते ५००० रुपये क्‍विंटलने या ठिकाणी शेंगांचे व्यवहार झाले. १८ मे रोजी दरात घसरणही झाली. ४००० ते ४५०० असा दर या दिवशी मिळाला.

अमरावतीत भुईमुगास ५८०० ते ६२५० रुपये दर
अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटात मात्र शेतकऱ्यांनी भुईमूग लागवडीत सातत्य राखले आहे. सध्या उत्पादित शेतीमालाचा हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने भुईमुगासह तीळ विक्रीसाठी बाजारात येत आहे. अमरावती बाजारात दर दिवशी भुईमुगाची सरासरी १२० क्‍विंटल इतकी आवक आहे. गेल्या हंगामाच्या शेवटी भुईमुगाचे दर ५००० रुपयांवर गेले होते. सध्या भुईमूग शेंगाचे व्यवहार ५८०० ते ६२५० रुपयांनी होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com