Maharashtra Cabinet Decision: तीर्थक्षेत्र भीमाशंकर, सिंहगडच्या किल्ल्याच्या विकास आराखड्याला मंजुरी

Funding for Tourism: राज्य शासनाने भीमाशंकर आणि सिंहगड किल्ल्याच्या पर्यटनविकास आराखड्यांना एकूण ५७४ कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे.
Government Decision
Government DecisionAgrowon
Published on
Updated on

Pune News: भीमाशंकर (ता. आंबेगाव) येथील तीर्थक्षेत्र आणि सिंहगड किल्ल्याच्या संवर्धन व विकास आराखड्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. सुमारे ५७४ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यातील विविध विकासकामांना निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

ग्रामीण भागात पर्यटनाद्वारे उत्पन्नाचा नवीन स्रोत निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने मंदिर आणि तीर्थक्षेत्रांचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येत असतात. तर गडकिल्ल्यांवर येणाऱ्या पर्यटकांची संख्याही मोठी आहे. त्या दृष्टीने या तीर्थक्षेत्र व गडकिल्ल्यांचा परिसराचा समग्र विकास आराखडा तयार करून तेथे येणारे भाविक आणि पर्यटकांना आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा,

Government Decision
Akola Development Fund : ‘नियोजन’च्या ३७४ कोटींच्या खर्चाला मंजुरी

परिसरातील विविध विकासकामे, रस्त्याची कामे, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, इको टुरिझम यांचा समावेश करून जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे विकास आराखडा सादर करण्यात आला होता. राज्य सरकारच्या उच्चाधिकार समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या आराखड्यांना मंजुरी देण्यात आली.

Government Decision
Farmer Issue: मोबदल्याच्या २४० कोटींच्या प्रस्तावाला मिळेना मंजुरी

सिंहगड किल्ल्यासाठी २८६ कोटी रुपये

समग्र सिंहगड किल्ला विकास आराखड्यालाही मान्यता देण्यात आली. हा आराखडा एकूण २८५ कोटी ९९ लाख रुपयांचा आहे. यात किल्ला संरक्षण, संवर्धन, मूल्यसंवर्धन, परिसर संस्था संरक्षण, भूमीचित्र विकास, ट्रेक मार्ग सक्रिटचा विकास, पार्किंग व आपत्कालीन सेवांचा विकास, प्रकाश व्यवस्था, पाणीपुरवठा विषयक कामे, ऐतिहासिक व लोककला, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. याठिकाणी असलेले अतिक्रमण काढण्यात आले आहे. त्यामुळे येथे भूसंपादनाची गरज भासणार नाही. आता शिखर समितीची मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.

भीमाशंकर विकास आराखडा दृष्टिक्षेपात

भीमाशंकर विकास आराखडा रक्कम : २८८ कोटी १७ लाख रुपये

११८ एकर जमिनीचे संपादन

२ हजार चारचाकी वाहने, २०० बसगाड्या, ५ हजार दुचाकीसाठी वाहन तळ

प्रतीक्षालय, स्नानगृहे, स्वच्छतागृहे, लॉकर, दुकानांसाठी- १६३ कोटी ९५ लाख रुपये

बस स्थानकाचा पुनर्विकास,

मंदिर जीर्णोद्धार ९० कोटी ४२ लाख रुपये

भोरगिरी इको सेन्सेटिव्ह झोनमधील खासगी जागेचे भूसंपादन,

राजगुरुनगर- भीमाशंकर रस्ता, कोटेश्‍वर मंदिर जीर्णोद्धार, ट्रेकिंग व वॉकिंग ट्रेलसाठी- ३३ कोटी ८० रुपये

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com