Mahesh Gaikwad
भारतातील मोठ्यातील लोकसंख्येची उपजीविका शेती आणि शेतीपूरक व्यवसायांसंबंधित उद्योगांवर अवलंबून आहे.
केंद्र आणि राज्य सरकारांकडून शेतकरी कल्याण्याच्या अनेक योजना राबविल्या जातात. यातील काही योजना या थेट आर्थिक लाभाच्या असतात.
शेती करताना शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळावे, या उद्देशाने थेट आर्थिक लाभ देणाऱ्या काही महत्त्वाच्या योजना राबविल्या जातात. याच योजनांची माहिती आज आपण पाहणार आहोत.
पंतप्रधान किसान सन्मान निधी ही शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देणारी सर्वात महत्त्वाची योजना आहे.
या योजनेंतर्गत देशातील छोट्या व अल्पभूधारक शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.
याशिवाय पंतप्रधान मानधन योजना ही सुध्दा केंद्र सरकारची एक खास योजना आहे. या योजनेत शेतकऱ्यांना पेन्शन देण्याची तरतूद आहे.
तसेच शेतकऱ्यांना शेती कर्जासाठी किसान क्रेडिट कार्ड ही योजना आहे. या योजनेत शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतचे कर्ज घेता येते.