Anticancer Drug : गोगलगायीच्या श्‍लेष्मात कर्करोगाचे औषध

Snail Mucus : गोगलगायीच्या श्‍लेष्मात प्रथमच प्रतिजैविकांसह कर्करोगविरोधी औषधांची पुष्टी झाली आहे.
Snail
Snail Agrowon
Published on
Updated on

Pune News : गोगलगायीच्या श्‍लेष्मात प्रथमच प्रतिजैविकांसह कर्करोगविरोधी औषधांची पुष्टी झाली आहे. तसेच रोगकारक डासांच्या अळीच्या नियंत्रणासाठी जैव-नॅनोकॉम्पोझिट प्रणालीही विकसित करण्यात जुन्नरच्या श्री शिव छत्रपती महाविद्यालयातील संशोधकांना यश आले आहे. या संशोधनामध्ये राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील तज्ज्ञांचा सहभाग आहे. या शास्त्रज्ञांनी कर्करोगविरोधी गुणधर्मांची शक्यता वर्तविणारा शोधनिबंध प्रसिद्ध केला होता.

शास्त्रज्ञांच्या गटाने ‘जायंट आफ्रिकन स्नेल’ अर्थात ‘अचॅटिना फुलिका’ गोगलगायीच्या श्लेष्मापासून (चिकट स्राव) तांबे आणि कोबाल्ट ऑक्साइड जैव-नॅनोकॉम्पोझिटचे संश्लेषण केले आहे. महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभागाचे प्रमुख व उपप्राचार्य प्रा. डॉ. रवींद्र चौधरी म्हणाले की, गोगलगायीच्या श्लेष्मात अल्प प्रमाणात प्रथिने असतात. ते  जैवरासायनिक संयुगाच्या संश्लेषणादरम्यान मदत करतात. त्यावरील आवरण म्हणून काम करतात.

Snail
Snail Control : गोगलगायीसाठी प्रतिबंधाबाबत उपाय करा

अभ्यास गटातील संशोधक डॉ. प्रमोद माने म्हणाले की, सध्याच्या जैव नॅनोकॉम्पोझिटमध्ये स्टॅफिलोकोकस ऑरियस, स्यूडोमोनास एरोजिनोसा या प्रतिजैविकांना दाद न देणाऱ्या जिवाणू बाबत प्रतिबंधक  गुणधर्म दिसून आले आहेत.

जैव नॅनोकॉम्पोझिटद्वारे मानवी गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग तसेच आतड्याच्या कर्करोगाच्या पेशींविरुद्ध अत्यंत आश्वासक कर्करोगविरोधी गुणधर्म दिसून आल्याची माहिती संशोधक डॉ. दीपाली माने आणि आदित्य चौधरी यांनी दिली.

Snail
Snail Crop Damage : मराठवाड्यात गोगलगायींचा ५५ हजार हेक्टरला फटका

हे संशोधन बायोमेड सेंट्रल आणि स्प्रींजर-नेचर या प्रख्यात आंतरराष्ट्रीय प्रकाशनाच्या ‘कॅन्सर नॅनोटेक्नॉलॉजी’ शोधपत्रिकेत नुकतेच प्रसिद्ध झाले आहे.

संशोधनाची वैशिष्ट्ये

जैव नॅनोकॉम्पोझिटचा कोणत्याही जीवमात्राला हानी होत नाही. तांबे आणि कोबाल्ट ऑक्साइड जैव नॅनोकॉम्पोझिटचे प्रयोग गहू पिकावर केले. गव्हाच्या उगवण क्षमतेवर तसेच त्यातील हरितद्रव्य, मुळांची आणि खोडाच्या वाढीवर कोणताही दुष्परिणाम होत नसल्याचे अभ्यासातून सिद्ध झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com