Snail Crop Damage : मराठवाड्यात गोगलगायींचा ५५ हजार हेक्टरला फटका

Snail Attack On Crop : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत यंदा खरीप हंगामात जवळपास ५५ हजार २७७.१२ हेक्टर क्षेत्राला गोगलगायींचा फटका बसला आहे.
Snail Control
Snail Control Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत यंदा खरीप हंगामात जवळपास ५५ हजार २७७.१२ हेक्टर क्षेत्राला गोगलगायींचा फटका बसला आहे. उपाययोजना सुचवून बहुतांश क्षेत्रातील गोगलगायींवर उपचार केल्याचा दावा तज्ज्ञांकडून केला जात आहे. शास्त्रज्ञांनी या विषयी उपाय सुचवावेत, अशी मागणी कृषी यंत्रणेकडून केली जात आहे.

गोगलगायींच्या नव्या संकटाने शेतकऱ्यांवर होत असलेल्या नैसर्गिक आपत्तीत आणखी भर घातली आहे. यंदा खरीप हंगामात मराठवाड्यात जवळपास ४७ हजार ४११ हेक्टर क्षेत्रावर गोगलगायींनी उच्छाद मांडला.

केवळ नदी-नाल्यांचा काठच नव्हे तर इतर भागातील शेतीतही गोगलगायींनी आक्रमण केले. केवळ खरीप पीकच नव्हे तर फळबागांनाही शंखी गोगलगायी सोडत नसल्याचे चित्र आहे.

Snail Control
Snails Damage Crops : बार्शीत सोयाबीन पिकांत शंखी गोगलगायींचा प्रादुर्भाव

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात २८१ शेतकऱ्यांच्या १९५ हेक्‍टरवर गोगलगायींनी आक्रमण केले. त्या पाठोपाठ जालना जिल्ह्यातील ७३९ शेतकऱ्यांच्या ३११ हेक्टरवर बीड जिल्ह्यातील ९८८ शेतकऱ्यांच्या ४७८ हेक्टरवर लातूर जिल्ह्यातील सर्वाधिक ४८ हजार ८१९ हेक्टरवर, धाराशिवमधील ४५७८ हेक्टरवर, नांदेडमधील ८०० हेक्टरवर, परभणीतील ३३.५० हेक्टरवर तर हिंगोली जिल्ह्यातील ६० हेक्टरवर गोगलगायींचा प्रादुर्भाव झाला होता.

Snail Control
Snail Preventing :शेतकऱ्यांच्या नाकी-नऊ आणणारी गोगलगाय नेमकी करते तरी काय?

लातूर विभागातील प्रादुर्भाव झालेल्या ५४२९२ हेक्टर क्षेत्रापैकी ४६ हजार ४६२ हेक्टर क्षेत्रावर उपचार केल्याचा दावा कृषीच्या यंत्रणेकडून केला जात आहे. विभागीय कृषी संशोधन व विस्तार सल्लागार समितीच्या बैठकीत शंखी गोगलगायी सोयाबीन फळपिके शेडनेटमधील मल्चिंगवरील मिरचीमध्ये आक्रमण करत आहे.

त्यावर उपाय सुचविण्याची मागणी ही कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांकडे केली जात आहे. संरक्षित शेतीतही गोगलगायींचा झालेला प्रादुर्भाव शेतकऱ्यांची चिंता वाढवितो आहे. यावर शास्त्रज्ञांनी पर्यावरण पूरकउपाय सुचविण्याची गरज शेतकरी व्यक्त होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com