Antibiotic Resistance : प्रतिजैविकांविरुद्ध निर्माण होतेय प्रतिकारकता...

मा णसांमध्ये जिवाणू, विषाणू, बुरशी, परजीवी अशा विविध सूक्ष्मजीवांमुळे निर्माण होणाऱ्या रोगांवर सूक्ष्मजीवविरोधी (ॲण्टिमायक्रोबियल) औषधांचा वापर केला जातो.
Antibiotic Resistance
Antibiotic ResistanceAgrowon

माणसांमध्ये जिवाणू, विषाणू, बुरशी, (Bacteria, viruses, fungi) परजीवी अशा विविध सूक्ष्मजीवांमुळे (Microorganisms) निर्माण होणाऱ्या रोगांवर सूक्ष्मजीवविरोधी (ॲण्टिमायक्रोबियल) औषधांचा वापर केला जातो. मात्र गेल्या काही वर्षामध्ये या औषधांविरुद्ध सूक्ष्मजीवांमध्ये प्रतिकारकता विकसित होत आहे. प्रतिकारकता विकसित झाल्यामुळे अनेक औषधे प्रभावहीन ठरत आहे, याच कारणामुळे २०१९ मध्ये सुमारे पाच दशलक्ष मृत्यू झाल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिली आहे.

संघटनेने दिलेल्या इशाऱ्यानुसार,२०५० पर्यंत सूक्ष्मजीवांमधील वाढत्या प्रतिकारक शक्तीच्या परिणाम स्वरूप जागतिक वार्षिक स्थूल दरडोई उत्पन्न (जीडीपी) ३.८ टक्क्यांनी घसरण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. प्रतिकारकता विकसित होण्याच्या प्रक्रियेवर वेळीच नियंत्रण न ठेवल्यास पुढील दशकात ‘जीडीपी’ लक्षणीय घटून २४ दशलक्ष लोक गरिबीच्या खाईत ढकलले जातील.

Antibiotic Resistance
Fruit Crop Planting : सांगली जिल्ह्यात वाढतेय फळबाग लागवड क्षेत्र

सूक्ष्मजीवविरोधी औषधांविरुद्ध सूक्ष्मजीवांमध्ये प्रतिकारशक्ती (ॲण्टिमायक्रोबीयल रेझिस्टन्स- एएमआर) निर्माण झाल्यास ही औषधे उपचारामध्ये प्रभावी ठरत नाहीत. परिणामी आजारांमध्ये वाढ होऊन मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) नोंदवले आहे. ही जागतिक पातळीवरील गंभीर समस्या ठरत असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

‘एएमआर’चे परिणाम

जागतिक आरोग्य संघटनेने २०१४ पासून निश्चित केलेल्या आठ प्राधान्यक्रमामध्ये ‘एएमआर’ची समस्या रोखण्याचाही समावेश आहे. ‘डब्ल्यूएचओ’च्या दक्षिण-पूर्व विभागांतील सर्व सदस्य देशांनी राष्ट्रीय कृती कार्यक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. २०१९ मध्ये जगभरात झालेल्या एकूण मानवी मृत्यूंपैकी सुमारे पाच दशलक्ष मृत्यू हे जिवाणूजन्य रोग नियंत्रणामध्ये प्रभावहीन ठरलेल्या प्रतिजैविकांशी संबंधित असल्याचा नवा जागतिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

यापैकी १.३ दशलक्ष मृत्यू हे थेट अशा प्रतिजैविकांशीच संबंधित असल्याचेही तज्ज्ञांनी म्हटले आहे. अशा परिणामांमुळे २०५० पर्यंत जागतिक वार्षिक स्थूल दरडोई उत्पन्न (जीडीपी) ३.८ टक्क्याने घसरेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यावर नियंत्रण न ठेवल्यास पुढील दशकात ‘जीडीपी’ वार्षिक ३.४ हजार अब्ज डॉलर्स इतक्या प्रमाणात घसरून २४ दशलक्ष लोक गरिबीच्या खाईत ढकलले जातील, असे मत ‘डब्ल्यूएचओ’ चे दक्षिण-पूर्व विभागाचे संचालक डॉ. पूनम खेतरपाल सिंग यांनी व्यक्त केले आहे

प्रतिजैविकांच्या अनिर्बंध वापरावर बंदीचा प्रस्ताव

विविध पिकांमध्ये जीवाणूजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी स्ट्रेप्टोमायसीन अधिक टेट्रासायक्लीन या प्रतिजैविकाचा (अँटिबायोटिक्स) वापर केला जातो. जनावरांमधील रोगांच्या उपचारासाठीही त्याचा वापर होतो. सातत्याने होणाऱ्या वापरामुळे या प्रतिजैविकाप्रति जीवाणूंमध्ये प्रतिकारशक्ती विकसित होण्याचा धोका निर्माण झाला आहे. जीवाणूंच्या प्रतिकारक्षम जातींचा विकासही होऊ शकतो.

Antibiotic Resistance
CIBIL Agri Loan: शेती कर्जांना ‘सीबील’मधून वगळण्याच्या मागणी | ॲग्रोवन

अशा गंभीर धोक्याचा विचार करून केंद्रीय कृषी मंत्रालयाने स्ट्रेप्टोमायसीन वर बंदी घालण्याचा प्रस्ताव गतवर्षी ठेवला. पशुधनामध्ये जैविक घटकांचा वापर केला जात असल्याने प्राणीजन्य उत्पादनामध्येही प्रतिजैविकांचे अंश आढळत आहेत. प्रतिजैविकांप्रति प्रतिकारक्षम झालेल्या जिवाणूंचा त्यातून मानवात संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे. अशा स्थितीमध्ये मानवी रोगांवरील उपचार निकामी होऊ शकतात.

शेतीत प्रतिजैविकांचा वापर ही समस्या जागतिक पातळीवरील समस्या आहे. मानवी व जनावरांवरील जिवाणूजन्य रोगांसाठी पूर्वी प्रभावी ठरणाऱ्या प्रतिजैविकांची परिणामकारकता कमी झाल्याचे तज्ज्ञ सांगतात. ही परिणामकारकता अबाधित ठेवण्यासाठी अनावश्यक वापर थांबवण्याची गरज तज्ज्ञ आहे. त्यामुळेच प्रतिजैविकांच्या अनिर्बंध वापरावर मर्यादा घालणे आवश्‍यक असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

सदस्य देशांकडून अंमलबजावणी

‘एएमआर’ समस्येवर मार्ग काढण्याच्या दृष्टीने ‘डब्ल्यूएचओ’ने जागतिक सूक्ष्मजीव नियंत्रण औषधे जागरूकता सप्ताहाचे आयोजन केले. त्यात तातडीने कार्यवाही कृती करण्याची गरज असल्याची घोषणा केली आहे. प्रत्येक सदस्य देशाकडून सूक्ष्मजीवांमध्ये औषधांप्रति निर्माण होणारी प्रतिकारकता, औषधांचा प्रमाणित वापर, मानवी आरोग्यासंबंधीचे मार्गदर्शक नियम व कार्यपद्धती यांच्या अनुषंगाने राष्ट्रीय देखरेख पद्धतीची अंमलबजावणीही सुरू केली आहे.

यासंबंधीच्या जागतिक संनियंत्रण व सर्वेक्षण प्रणालीमध्ये (Global Antimicrobial Resistance Surveillance System) सर्व सदस्य देशांचा समावेशही करण्यात आला आहे. ‘डब्ल्यूएचओ’ चा दक्षिण- पूर्व विभागामध्ये प्रत्येक देशाला स्वमूल्यांकन सर्वेक्षण करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.

सदस्य देशांसमोरील आव्हाने व उपाय ः

वैद्यकीय आणि औषधेविषयक सामग्रीची असुरक्षित विल्हेवाट.

अन्न उत्पादनामध्ये ‘एएमआर’ उत्पादनांच्या वापरासंबंधी अपुरी नियामक पद्धती.

संसर्गास प्रतिबंध करण्यासंदर्भातील आणि आरोग्य सुविधांसाठी अपुरी साधने.

सुरक्षित पाण्याची उपलब्धता नसणे.

हवामानातील बदलांमुळे जीवाणूंमध्ये निर्माण होणारी प्रतिकारकता व प्रतिकारक जिवाणूंची पैदास वाढणे.

Antibiotic Resistance
Onion Plant : भाऊ, दादा आम्हलेही कांदानं उळे मिळई का!

वरील आव्हाने लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटना, अन्न आणि कृषी संघटना, जागतिक पशू आरोग्य संघटना, संयुक्त राष्ट्रसंघांतर्गत पर्यावरण कार्यक्रम यांनी संयुक्तपणे कार्यक्रम राबविण्याचे ठरवले आहे. सूक्ष्मजीवांमुळे होणाऱ्या रोगांच्या उपचारासाठी एखादे औषध विकसित करण्यासाठी १० ते १५ वर्षांचा कालावधी लागतो. सुमारे एक अब्ज अमेरिकी डॉलरहून अधिक खर्च येतो. त्या तुलनेमध्ये कमी खर्चामध्ये जागरूकता मोहीम राबवता येऊ शकते. या जागरूकता मोहिमेमुळे प्रादेशिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर जाणीव जागृती होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com