Diabetes : मधुमेह रोखण्याचे सामर्थ्य चारशे वनस्पतींमध्ये

Diabetes Update : बदलत्या जीवनशैलीबरोबरच मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली असून, आता या आजारासमोर विविध ॲलोपॅथिक औषधेदेखील प्रभावी ठरत नसल्याचे पाहायला मिळते.
Diabetes
DiabetesAgrowon

Indian Agriculture : बदलत्या जीवनशैलीबरोबरच मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली असून, आता या आजारासमोर विविध ॲलोपॅथिक औषधेदेखील प्रभावी ठरत नसल्याचे पाहायला मिळते. मधुमेहावरील उपचारासाठी संशोधक आता औषधी वनस्पतींवर त्याअनुषंगाने संशोधन करत आहेत.

या आजारावरील रामबाण औषध हे झाडांपासूनच तयार होऊ शकते, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. आपल्या सभोवताली किमान चारशे अशा औषधी वनस्पती आहेत, त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होऊ शकते. आतापर्यंत केवळ २१ औषधी वनस्पतींबाबतच सखोल अभ्यास झाला असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

सध्या मधुमेह नियंत्रित करण्यासाठीची बरीचशी ॲलोपॅथिक औषधेही वनस्पतींशी संबंधित आहेत. या वनस्पतींपासूनच मधुमेहावरील रामबाण औषध तयार होऊ शकते हे सिद्ध झाले आहे, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

पुदुच्चेरी येथील ‘जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च’ आणि ‘एम्स-कल्याणी’ या संस्थेतील अभ्यासकांनी हे संशोधन केले होते. ‘वर्ल्ड जर्नल ऑफ डायबेटिस’ या नियतकालिकामध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

Diabetes
Jamun Seed Health Benefit : मधुमेह ते वाढलेलं वजन ; अनेक आजारांवर जांभूळ गुणकारी

सध्या जंगलामध्ये आढळून येणाऱ्या चारशे वनस्पतींमध्ये मधुमेहाला रोखण्याचे सामर्थ्य आहे. हा झाडपाला ‘टाईप- टू’च्या मधुमेहाला नियंत्रित ठेवू शकतो. आतापर्यंत केवळ २१ प्रकारच्या वनस्पतींवरच हे संशोधन झाले आहे.

यामध्ये विजयसार, जांभूळ, जिरे, दारूहरिद्र, तोंडली, बेल, मेथी, लिंबू, आवळा आणि हळद यांचा समावेश आहे. या सगळ्या वनस्पतींमध्ये मोठ्या प्रमाणावर मधुमेह रोखणारे घटक असल्याचे स्पष्ट झाले आहेत.

‘बीजीआर-३४’ चा दाखला

आणखी अशाच बहुसंख्य वनस्पती असून त्यापासून मधुमेहावरील रामबाण औषध तयार केले जाऊ शकते असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. यासाठी अभ्यासकांनी ‘बीजीआर-३४’ या औषधाचे उदाहरण दिले. या गोळ्यांच्या निर्मितीसाठी दारूहरिद्र, गुरमार, मेथी आणि विजयसार या वनस्पतींमधील औषधी घटकांचा वापर करण्यात आला आहे.

मागील वर्षी ‘एम्स- दिल्ली’ने केलेल्या संशोधनामध्ये ‘बीजीआर-३४’ हे औषध केवळ रक्तातील साखरच नाही तर स्थुलत्व देखील कमी करत असल्याचे दिसून आले होते. या आयुर्वेदिक औषधाचा चयापचय प्रक्रियेलाही फायदा होत असल्याचे दिसून आले आहे.

Diabetes
Health Center : आरोग्य उपकेंद्र ४ वर्षांपासून बंद

या घटकांतही सामर्थ्य...

डाळिंब, शिलाजित, चवळीच्या शेंगा, चहा आणि केशरामध्ये मधुमेहाला रोखणारे घटक आहेत. ‘एसजीएलटी-२’ या मधुमेहविरोधी औषधामध्ये वापरण्यात येणारा फ्लोरिझीन हा घटक सफरचंदाच्या झाडाच्या खोडापासून काढण्यात येतो, असा दावा अभ्यासकांनी केला आहे.

(स्त्रोतः वृत्तसंस्था)

देशातील मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा स्थितीमध्ये विविध औषधी वनस्पती व त्यांचा वापर उपचारामध्ये करणारे आयुर्वेद हे पारंपरिक उपचारशास्त्र नक्कीच आपल्याला मार्ग दाखवू शकतो.
डॉ. संचित शर्मा, कार्यकारी संचालक, एआयएमआयएल फार्मास्युटिकल्स

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com