Maharashtra Government : महाराष्ट्रात गुंतवणूक करणारे अनेक प्रकल्प यापूर्वीच परराज्यात गेले असताना आता आणखी एक प्रकल्प परराज्यात गेल्याचे माहिती समोर आली आहे. याबाबतचे ट्विट विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केल आहे.
तसेच राज्यात येणारी गुंतवणूक कमी होत असल्यामुळे राज्य अधोगतीला जाते की काय अशी शंका व्यक्त दानवेंनी केली. राज्याची प्रगती, तरुणांचा रोजगार दुसऱ्याच्या घशात घालण्याबाबत दानवे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
याबाबत अशी माहिती की, राज्यातील छत्रपती संभाजीनगर किंवा दाभोळ येथे गेल इंडिया ही पेट्रोकेमिकल्स कंपनी ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार होती. या गुंतवणुकीच्या माध्यमातून इथेन क्रॅकिंग युनिट उभारणार होते. आता हा प्रकल्प महाराष्ट्रात न येता मध्यप्रदेशच्या सिहोर येथे उभारला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
हा प्रकल्प महाराष्ट्राचा विचार करत असताना मध्य प्रदेशात कसा गेला? महाराष्ट्राचा वाट्याला येणारा रोजगार असा सहज बाहेर कसा गेला? याचे उत्तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री यांनी द्यावे, अशी मागणी दानवे यांनी केली आहे.
सदर कंपनीने प्रकल्प उभारणीच्या जागेसाठी विचारणा केली होती ? याबाबत चाचपणी होऊनही महाराष्ट्रात या प्रकल्पाची उभारणी का करण्यात आली नाही ? सरकारी कंपनी असल्याने मध्य प्रदेशात हा प्रकल्प नेण्यासाठी केंद्राने दबाव टाकला का? याची उत्तरे सरकारने द्यावी, असे दानवे यांनी म्हटले.
महाराष्ट्रात येणारी गुंतवणूक केंद्राच्या दबावामुळे सतत परराज्यात जातेय. एकप्रकारे प्रधानमंत्री हे महाराष्ट्रावर बेगडी प्रेम दाखवत आहेत. राज्यातील तरुणांच्या हाताला मिळणार रोजगार हिसकावून दुसऱ्याच्या घशात घालण्याचा पाप भाजप करत असल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.