
Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्हा परिषदेचा वारसा सांगणाऱे ऐतिहासिक अण्णासाहेब शिंदे सभागृह भुईसपाट करण्यात आले आहे. इमारत खराब झाल्याने ही इमारत धोकादायक असल्याचे सांगत जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने ती निर्लेखित केली होती. त्यामुळे ऐतिहासिक वास्तू पाडावा लागली असे सांगितले जात आहे.
अहिल्यानगर जिल्हा परिषदेचा पूर्वी कारभार जुन्या ब्रिटिशकालीन इमारतीतून होत होता. राज्याच्या राजकारणात अधिक पकड निर्माण करणारे अहिल्यानगर जिल्ह्यातील स्व. पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील, शंकरराव काळे, शंकरराव कोल्हे, यशवंतराव गडाख, अप्पासाहेब राजळे, मारुतराव घुले आदी नेत्यांनी याच जिल्हा परिषदेतून राजकारणाला सुरवात केली.
नूतन इमारत बांधल्यानंतर जुन्या प्रशासकीय इमारतीमधून जिल्हा परिषदेचा कारभार हा नवीन इमारतीत हलवण्यात आला. मात्र आताही ही ब्रिटिशकालीन जुनी इमारत सुस्थितीत आहे. अहिल्यानगर जिल्ह्याची ओळख असणाऱ्या ब्रिटिशकालीन घड्याळाच्या इमारतीतून कारभार चालत होता. १९६७ ला जिल्हा परिषदेत शंकरराव काळे यांना अध्यक्षपद मिळाले. त्यानंतर काळाच्या ओघात २०१९ पर्यंत २२ जणांनी नगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली.
जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले यांचा २०२२मध्ये कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासकराज आले. २००६ पर्यंत या जुन्या अण्णासाहेब शिंदे सभागृहात जिल्हा परिषदेच्या दर तीन महिन्यांनी नियमित सर्वसाधारण सभा होत होत्या. नवीन इमारतीत स्थलांतर झाल्यानंतर हे सभागृह अडगळीत पडले. कालांतराने तर ती वास्तू भंगारात काढली गेली.
प्रशासकराजवर आरोप
खर तर या ऐतिहासिक वारसा असलेले अण्णासाहेब शिंदे सभागृहाची तत्कालीन अध्यक्ष राजश्री घुले यांनी दुरुस्ती करण्याचे प्रशासनाला सुचविले होते. मात्र, त्यानंतर जिल्हा परिषदेवर प्रशासकराज आले. त्यांनी दुरुस्तीऐवजी थेट सभागृहच भुईसपाट केले. आता त्या जागी कोणताही इमारत न बाधता पार्किंग करणार असल्याचे बोलले जात आहे.
केवळ प्रशासन राज असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने हे सभागृह पाडले असल्याचा आरोप होत आहे. हे सभागृह दुरुस्त करता आले असते. एकीकडे ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी सरकार पुढाकार घेत असताना अधिकारी त्या वास्तू भुईसपाट करीत असतील, तर हे योग्य नाही, अशा प्रतिक्रिया पदाधिकाऱ्यांतून येत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.