ZP Administration : जिल्हा परिषद, पंचायत समित्यांवर प्रशासकराज सुरू

Panchayat Administration : कार्यकाळ संपल्याने नव्याने निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आता जिल्हा परिषद, पंचायत समित्यांवर प्रशासकीय कारभार सुरू झाला आहे.
Akola ZP
Akola ZPAgrowon
Published on
Updated on

Akola News : कार्यकाळ संपल्याने नव्याने निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आता जिल्हा परिषद, पंचायत समित्यांवर प्रशासकीय कारभार सुरू झाला आहे. अकोला, वाशीम जिल्हा परिषद आणि या जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांवर प्रशासक बसवण्यात आले आहेत.

जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ गुरुवारी संपला. शुक्रवार (ता.१७) पासून जिल्हा परिषदेचा कारभार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तर पंचायत समित्यांचा कारभार गटविकास अधिकारी सांभाळणार आहेत.

पाच वर्षांचा कार्यकाळ संपल्यामुळे जिल्हा परिषदेच्या सदस्यांना निरोप देण्यासाठी सिव्हिल लाईन चौकातील संविधान सभागृहात कार्यक्रम झाला. यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी पाच वर्षांत केलेल्या कामकाजाची माहिती दिली.

Akola ZP
Administration On ZP : राज्यातील जिल्हा परिषदांवर अमर्याद काळ प्रशासक

यावेळी सत्ताधारी व विरोधकांनी मतभेद विसरून एकमेकांच्या कामकाजाची प्रशंसा केली. निधी वाटपात काही प्रमाणात भेदभाव झाल्यामुळे काही सदस्यांनी सोहळ्यात सत्ताधाऱ्यांवर टीका सुद्धा केली.

या वेळी मावळत्या अध्यक्षा संगीता अढाऊ, उपाध्यक्ष सुनील फाटकर, सभापती माया नाईक, सभापती रिजवाना परवीन, योगिता रोकडे, आम्रपाली खंडारे, पुष्पाताई इंगळे, प्रतीभा भोजने, गजानन पुंडकर यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते.

Akola ZP
ZP Administrator : सोलापूर जिल्हा परिषदेवर दोन वर्षांपासून प्रशासक

वाशीममध्येही प्रशासक राज

वाशीम : जिल्हा परिषद व सहा पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ प्रशासकराज सुरू झाले. १७ जानेवारी २०२० मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीची सार्वत्रिक निवडणूक झाली होती. १६ जानेवारी २०२० रोजी पंचायत समिती सभापती व उपसभापती, तर १७ जानेवारी २०२० रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड झाली होती.

त्यामुळे पाच वर्षांचा कार्यकाळ संपल्याने राज्याच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद व पंचायत समितीवर अनुक्रमे मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांना प्रशासक म्हणून नियुक्त करण्याबाबतचे शासन आदेश जारी केले. त्यानुसार वाशीम, मंगरूळपीर, कारंजालाड, मालेगाव, रिसोड, मानोरा या पंचायत समित्यांवर प्रशासक आले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com